close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सोहळ्यावर बहिष्कार टाकणाऱ्या एरियाना ग्रॅन्डला 'ग्रॅमी अवॉर्ड' घोषित

नवी दिल्ली : लॉस एन्जेलिसमध्ये १० फेब्रुवारी रोजी जगातील '६१ वा ग्रॅमी अवॉर्ड' सोहळा पार पडला. यावेळी, जगातील अनेक स्टार्सनं मंचावर हजेरी लावली आणि परफॉर्मन्सही केले.

Feb 11, 2019, 16:14 PM IST

लॉस एन्जेलिसच्या स्टेपल्स सेंटरमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 

1/5

एरियानाचा पहिलाच ग्रॅमी अवॉर्ड

एरियानाचा पहिलाच ग्रॅमी अवॉर्ड

उल्लेखनीय म्हणजे, '६१ वा ग्रॅमी अवॉर्ड' सोहळ्यावर बहिष्कार टाकणाऱ्या अमेरिकन गायिका एरियाना ग्रॅन्ड हिलाच या कार्यक्रमात अवॉर्ड घोषित करण्यात आला. हा एरियानाचा पहिलाच ग्रॅमी अवॉर्ड ठरलाय. 

2/5

'स्वीटनर'साठी कौतुक

'स्वीटनर'साठी कौतुक

रविवारी 'ग्रॅमी अवॉर्ड' सोहळा सुरू होण्यापूर्वी काही वेळ अगोदर 'रेकॉर्डिंग' अकादमीनं ही घोषणा केली. एरियानाला 'स्वीटनर'साठी सर्वोत्कृष्ठ पॉप वोकल अल्बमचा अवॉर्ड देण्यात आला. यावेळी, अकादमीनं इतरही अनेक विजेत्यांच्या नावाची घोषणा केली. 

3/5

निर्मात्यांशी मतभेद

निर्मात्यांशी मतभेद

एरियाना ग्रॅन्ड या कार्यक्रमात आपला परफॉर्मन्स सादर करणार होती. परंतु, आपल्या 'सेट लिस्ट'वरून तिचे निर्मात्यांशी मतभेद झालेत. त्यानंतर एरियानानं या कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला होता.

4/5

चाहत्यांचे आभार

चाहत्यांचे आभार

ग्रॅमी जिंकल्यानंतर एरियानानं ट्विट केलं 'मला माहीत आहे की मी आज रात्री तिथं नाही'

5/5

'मी पूर्ण प्रयत्न केले पण...'

'मी पूर्ण प्रयत्न केले पण...'

विश्वास ठेवा, सर्व काही व्यवस्थित व्हावं यासाठी मी पूर्ण प्रयत्न केले होते परंतु... मी खूप छान आणि सुंदर आहे, असंही एरियाना ग्रॅन्डनं म्हटलंय. यानंतर एरियाना ग्रॅन्ड हिनं आपल्या चाहत्यांचे आभार मानलेत (फोटो सौजन्य : एरियाना ग्रॅन्ड इन्स्टाग्राम)