जेव्हा सरन्यायाधीश हार्ले डेव्हिडसनवरून येतात....

Jun 29, 2020, 10:16 AM IST
1/5

सरन्यायाधीश म्हटलं की एक साचेबद्ध प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहते. पण, या प्रतिमेला शह देत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यासाधीश एस.ए. बोबडे यांनी सध्या साऱ्या देशाचं लक्ष वेधलं आहे. 

2/5

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोंमध्ये सरन्यायाधीश बोबडे हे हार्ले डेव्हिडसन बाईकवर बसल्याचं दिसत आहे. हे फोटो नागपूरमधील असल्याचं सांगण्यात येत आहे. 

3/5

सीजेआय बोबडे यांच्याकडे हार्ले डेव्हिडसनची लिमिटेड एडिशनची CVO 2020 ही बाईक आहे. त्यांना बाईक चालवण्याची आवड असल्याचंही सांग्यात येतं. 

4/5

सोशल मीडियावर व्हायरल होणारे त्यांचे हे फोटो पाहता त्याचा सहज अंदाज लावता येत आहे. 

5/5

व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये आपल्या आवडीची बाईक चालवल्याचा आनंद बोबडे यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे.