Supriya Sule Birthday : शरद पवारांची कर्तबगार लेक! तळागाळापर्यंत पोहोचलेल्या सुप्रिया सुळेंचा थक्क करणारा जीवनप्रवास

Supriya Sule News : राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा आज वाढदिवस. सुप्रिया सुळे यांनी 55 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. जनसामान्यांच्या मनात घर करणाऱ्या शरद पवाराच्या कर्तबगार लेकीचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. 

Jun 30, 2023, 10:29 AM IST

Supriya Sule Birthday : राजकारणाचा वारसा असतानाही स्वबळावर राज्यात आणि केंद्रातही आपली ओळख निर्माण करणाऱ्या सुप्रिया सुळे यांचा आज 54 वा वाढदिवस आहे. महाराष्ट्राची नस ओळखणारे, राज्य आणि केंद्रातील राजकारण ज्यांच्या अवतीभोवती फिरतं त्या शरद पवारांची लेक आज वडिलांप्रमाणेच सर्वसामान्यांच्या मनात राज्य करते.  (supriya sule birthday june 30 special unkown information NCP MP Maharashtra Politics news )

1/15

शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीची धुरा कोण सांभाळणार? पवारांचा उत्तराधिकारी कोण? अशी जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा सुप्रिया सुळे यांचं नाव पुढे येतं. 3 मे 2023 ला शरद पवार यांनी राजकारण्यातून निवृत्तीची घोषणा केली तेव्हा सुप्रियाताईंकडे झुकतं माप दिसतं होतं. 

2/15

राजकारणात थेट संसदेतून सुरुवात करणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत महाराष्ट्रातील अनेक मुद्दे प्रखरपणे लावून धरले. महाराष्ट्राची ही लेक दिल्लीत कायम सर्वसामान्यांसाठी लढताना दिसत आहे. 

3/15

आपल्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना जे आवाहन केलं त्यानंतर ही लेक प्रत्येकाच्या मनात राज्य करत आहे. ''शुभेच्छुकांनी फुलं, पुष्पगुच्छ, भेटवस्तू न आणता त्याऐवजी आपल्या आसपासच्या परिसरात राहणाऱ्या गरजू शाळकरी मुलांना पुस्तकं, शालेय वस्तू, रेनकोट, भेटवस्तू या गोष्टींचं वाटप करावं.''  

4/15

आषाढी वारीमध्ये दरवर्षी ही माऊली सहभागी होते. डोक्यावर तुळस घेत, फुगडी खेळत ही लेक माऊलींच्या चरणी नतमस्तक झाली. वारीतील त्यांचा सर्वसामान्यांसोबतचा वावर प्रत्येकाला त्या आपल्यातील एक आहे, हे जाणीव करुन देत होतं. 

5/15

त्या सर्वसामान्यांच्या मनात राज्य करतात याची अनेक उदाहरण आहेत. ज्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात फिरतात. कधी कोणाच्या घरी खाली बसून जेवतात. कधी रस्त्यात महिलेशी संवाद साधत तिच्याकडील भाजी घेतात. 

6/15

तळागाळात फिरताना चिमुकलं दिसलं की त्याला माया करण्याचा मोह त्यांना आवरत नाही. च्या लेकांना घेत त्यांवर प्रेमाचा वर्षावर करताना त्या अनेक वेळा दिसतात.   

7/15

वडील शरद पवार यांच्या पावलावर पाऊल देत त्याही राज्यापासून केंद्रापर्यंत माणसं जोडताना दिसतात. वडिलांच्या शिकवणीचा वारस त्या खऱ्या अर्थाने कायम जपताना दिसतात. राजकीय कार्यक्रम असो किंवा कोणाच्या घरातील कार्यक्रम त्या कायम तिथे असतात. अनेक वेळा राजकारणाती शत्रूत्व बाजूला ठेवून त्या घरातील सुप्रिया सुळे एक सदस्य होतात. 

8/15

बापलेकीचं नातंही तेवढंच खास आहे. हे लेकी बापाची सावली आहे, पावलोपावली त्यांच्या मागे ती उभी असते. शरद पवार आणि सु्प्रिया सुळे यांच्या नात्याची झलक दाखणाऱ्या त्या कृतीने नरेंद्र मोदींचंही लक्ष वेधून घेतलं होतं. 

9/15

भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनच्या वेळीचा हा फोटो आहे. ज्यावेळी पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर शरद पवार खुर्चीवर येऊन बसले. त्यावेळी वडिलांना बूट घालण्यासाठी मदतीला ही लेक खाली बसली. कसलाही विचार न करता तिने खाली बसून वडिलांना बूट घालण्यास मदत केली. 

10/15

घरामध्येही प्रत्येक नाती त्या जिव्हाळ्याने सांभाळतात. रक्षाबंधन दिवाळीला घरातील प्रत्येक महिला एकत्र येतात. त्यावेळी सु्प्रियाताईंचं वहिणी, बहिणींसोबतच नातं दिसून येतं. अजित पवार यांच्याशी राजकारणापलीकडील भावा बहिणीचं नातंही खूप खास आहे. 

11/15

सुप्रिया सुळे यांच्या व्यक्तित्वातील अजून एक खासियत आहे, जी महिलांना खास करुन आकर्षित करते. त्यांचं साधं राहणीमान, साधी कॉटनची साडी, तो पदर, कपाळावर टिकली आणि गळात साधं मंगळसूत्र...त्यांचा हा साधेपणा अनेकांना मोहित करतो. 

12/15

सुप्रिया सुळे यांच्या शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर मुंबईतील जय हिंद महाविद्यालायतून सुक्ष्मजीवशास्त्र (Microbiology) या विषयात त्यांनी पदवी घेतली. सदानंद भालचंद्र सुळे यांच्याशी लग्न केल्यावर त्या कॅलिफॉर्नियात गेल्या. तिथेही त्यांनी जल प्रदूषण या विषयाचं शिक्षण घेतलं. 

13/15

राजकारणात येण्यापूर्वी त्या काळात शरद पवारांची मुलगी एवढंच त्यांची ओळख होती.  2006 मध्ये निवडणूक जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांनी बाळासाहेबांची भेट घेतली आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या केंद्रात उमेदवारीसाठी सु्प्रिया सुळे हे नाव पुढे आलं. 

14/15

 त्यावेळी बाळासाहेबांनी कमळाबाईला पटवत सुप्रिया सुळे यांना बिनविरोध केंद्रात बसवलं. त्यानंतर सु्प्रिया सुळे हे नाव आज प्रत्येकाच्या ओठावर आहे. त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही. 

15/15

राजकारणात आल्यावर त्यांनी तरुणींशी जोडण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसची सुरुवात केली. यातून राज्यात होणाऱ्या स्त्री-भ्रूण हत्यांविरोधात त्यांनी लढा दिला. अशा प्रकारे सुप्रिया सुळे तरुणी आणि महिलांमधील एक झाल्या. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x