250 कोटी रुपये खर्च करुन बांधलेलं मैदान जमीनदोस्त करणार; रोहितनेही व्यक्त केलेली नाराजी

250 Crore Rs Worth Cricket Ground Will Be Demolish: हे मैदान मागील काही काळापासून सातत्याने चर्चेत आहे. अगदी रोहित शर्मानेही या मैदानासंदर्भात नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता 29 जून नंतर हे मैदाना उद्धवस्त केलं जाणार आहे. जाणून घेऊयात या मैदानासंदर्भात...

| Jun 13, 2024, 10:39 AM IST
1/12

Rs 250 CRORE venue dismantled

सध्या अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 वर्ल्ड कप 2024 ची स्पर्धा सुरु असून ही स्पर्धा अगदीच रंजक वळणावर असून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सुपर 8 च्या फेरीसाठी 12 जून रोजीचा आपला तिसरा सामना जिंकून पात्र ठरला आहे.

2/12

Rs 250 CRORE venue dismantled

अमेरिकेतील 3 आणि वेस्ट इंडिजमधील 6 अशा एकूण 9 मैदानांवर टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे सामने खेळवले जात आहेत.  

3/12

Rs 250 CRORE venue dismantled

अमेरिकेत ज्या मैदानांवर सामने खेळवले गेले त्यात न्यू यॉर्कमधील नासो इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमचाही समावेश असून इथेच भारताचे पहिले तीन सामने खेळवण्यात आलेत.  

4/12

Rs 250 CRORE venue dismantled

भारताने अमेरिका, पाकिस्तान आणि आयर्लंडविरुद्धचे सामने याच नासो इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर जिंकले.  

5/12

Rs 250 CRORE venue dismantled

मात्र या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेआधी न्यू यॉर्कमध्ये क्रिकेटचं मैदानच नव्हतं. अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने लाँग आइसलँड येथे अगदी शून्यातून 34 हजार प्रेक्षक क्षमतेचं मैदान उभारलं. हा पाहा वर्षभरापूर्वीचा आणि आताचा फोटो

6/12

Rs 250 CRORE venue dismantled

समोर आलेल्या माहितीनुसार, न्यू यॉर्कमधील नासो इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी आयसीसीने 30 मिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 250 कोटी रुपये खर्च केले आहेत.

7/12

Rs 250 CRORE venue dismantled

मात्र अमेरिकेतील हे सर्वात नवं क्रिकेट स्टेडियम टेम्पररी म्हणजेच तात्पुरत्या स्वरुपाचं आहे, असं तुम्हाला सांगितल्यास नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. मात्र हे खरं आहे.  

8/12

Rs 250 CRORE venue dismantled

आयसीसीने 250 कोटी रुपये खर्च केले असली तरी जगभरात क्रिकेट अगदी नियमितपणे खेळल्या जाणाऱ्या देशांतील स्टेडियमप्रमाणे सर्व आधुनिक सोयीसुविधा या मैदानात कमी वेळात उपलब्ध करुन देता आलेल्या नाहीत.

9/12

Rs 250 CRORE venue dismantled

आयसीसीने या मैदानावर ड्रॉप इन खेळपट्टा वापरल्यात. म्हणजेच अॅडलेडवरुन या तयार केलेल्या खेळपट्टी आणून येथे बसवण्यात आली.  

10/12

Rs 250 CRORE venue dismantled

मात्र या ड्रॉप इन खेळपट्टीबद्दल अगदी रोहित शर्मापासून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या खेळपट्टीवर जास्त धावा करता येत नाही असं दिसून आलं आहे.  

11/12

Rs 250 CRORE venue dismantled

भारत आणि अमेरिकेत खेळवण्यात आलेला 12 जूनचा सामना या मैदानावरील शेवटचा सामना होता.  

12/12

Rs 250 CRORE venue dismantled

12 जून रोजी झालेल्या सामन्यानंतर आता स्पर्धा संपल्यावर म्हणजेच 29 जूननंतर हे मैदान पूर्णपणे उद्धवस्त केलं जाणार आहे. आजपासून म्हणजेच 13 जूनपासूनच विचार केल्यास हे मैदान पुढील 16 दिवसच अस्तित्वात असणार आहे.