Taarak Mehta : पहिल्या शोमध्ये अगदी वेगळे दिसायचे जेठालाल, दयाबेन आणि अब्दुल

Sep 22, 2021, 15:29 PM IST
1/8

दिलीप जोशी

दिलीप जोशी

दिलीप जोशी (Dilip Joshi) यांना आपण त्यांच्या खऱ्या नावाने कमी ओळखतो. आणि ते साकारत असलेल्या जेठालाल या नावाने जास्त ओळखतो.  दिलीप टीवी सीरियल तारक मेहता का उल्‍टा चश्‍मामधील प्रमुख कलाकार आहेत. दिलीप जोशी यांनी आपल्या करिअरची सुरूवात 1994 मध्ये केली. `कभी यह कभी वो` मधून केली होती. तसेच टीव्ही इंडस्ट्रीच्या अगोदर दिलीप यांनी `मैने प्यार किया` आणि `हम आपके हैं कौन` या सिनेमात छोटी भूमिका साकारली आहे. 

2/8

अमित भट्ट

अमित भट्ट

`तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा` (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मध्ये जेठालाल यांचे वडील बाबूजी म्हणजे चंपकलाल अभिनेता अमित भट्ट (Amit Bhatt)  यांच्या अभियनाचे असंख्य चाहते आहेत.  अमितने आपल्या करियरची सुरूवात टीवी सीरियल `यस बॉस`मधून केली होती. त्यानंतर `खिचड़ी` मालिकेत दिसले होते. जो एक कॉमेडी शो होता आणि 2002 मध्ये अतिशय लोकप्रिय होता. 

3/8

शैलेश लोढा

शैलेश लोढा

शैलेश लोढा तारक मेहताची भूमिका साकारत आहे. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आवड असल्यामुळे शैलेशने 2007 मध्ये प्रसिद्ध कॉमेडी शो 'कॉमेडी सर्कस' मध्ये भाग घेतला आणि तेव्हापासून तो या इंडस्ट्रीशी जोडला गेला.

4/8

दिशा वकानी

दिशा वकानी

दिशा वाकाणीने तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये दया भाभीची भूमिका साकारली होती. दिशा वाकानी तारक मेहता का उल्टा चष्माच्या आधीही काही कॉमेडी शोमध्ये दिसली आहे. तिचा पहिला शो 'खिचडी' होता, दिशाने तिच्या टीव्ही करिअरची सुरुवात 2002 मध्ये या टीव्ही सीरियलद्वारे केली होती.

5/8

श्याम पाठक

श्याम पाठक

पोपटलालची भूमिका साकारणारा श्याम पाठकही खूप लोकप्रिय आहे. श्यामने `जस्सुबेन जयंतीलाल जोशी की जॉइंट फैमिली` या मालिकेतून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. यापूर्वी श्यामने एक चिनी चित्रपटही केला आहे. 'घुंगघाट' या हिंदी चित्रपटातही त्यांनी छोटी भूमिका केली.

6/8

मुनमुन दत्ता

मुनमुन दत्ता

बबिताजींना कोण ओळखत नाही? ही भूमिका अभिनेत्री मुनमुन दत्ता दिसत आहे. मुनमुनने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात २००४ साली 'हम सब भारती' पासून केली. या टीव्ही सिरियलमध्ये दिलीप जोशीही त्याच्यासोबत दिसला होता.

7/8

राज अंदकत

राज अंदकत

राज अदंकत अर्थात टप्पूने यापूर्वी 'एक रिश्ता भागीदारी' केली होती. हा त्याचा पहिला शो होता. अभिनेता 2016 मध्ये या शोशी संबंधित होता.

8/8

शरद संकला

शरद संकला

अब्दुलची भूमिका साकारणाऱ्या शरद संकलाची भूमिकाही प्रेक्षकांना आवडते. शरदने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 'बाजीगर' चित्रपटातील छोट्या भूमिकेने केली. नंतर तो अनेक वर्षे कामाच्या शोधात होता आणि नंतर हा शो मिळाला.