Disha Vakani : 'तारक मेहता' सोडल्यानंतर दयाबेन कमवते कोट्यावधी रुपये, कसं ते जाणून घ्या

Disha Vakani Life :  'तारक मेहता' (Taarak Mehta) मालिकेतून बाहेर पडलेल्या दयाबेनचा एक व्हिडीओ (Viral Video)सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. यात तिची अवस्था पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का? 'तारक मेहता' सोडल्यानंतरही दयाबेन कमावतात कोट्यावधी रुपये. 

Jan 13, 2023, 10:34 AM IST

Disha Vakani Life :  'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही सर्वात लोकप्रिय मालिका म्हणायला हरकत नाही. कुटुंबीय आणि लहान्यापासून मोठ्यापर्यंत या मालिकेने वेड लावलं आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये या मालिकेतील वेगवेगळे पात्र निभवणारे कलाकार यांनी जय महाराष्ट्र केलं आहे. त्यामुळे रसिकांचा हिरमूड झाला आहे. त्यातील सगळ्यात गाजलेलं पात्र म्हणजे दयाबेन...दयाबेन म्हणजे अभिनेत्री  दिशा वकानी (Disha Vakani) हिनेदेखील या मालिकेला राम राम केला आहे. पण तरीदेखील ती कोट्यावधीच्या घरात पैसे कमवते. ते कसं हे जाणून तुम्हाला धक्काच बसेल. (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Dayaben earns crores of rupee Disha Vakani luxurious Life marathi entertainment news)

1/7

Disha Vakani

अभिनेत्री दिशा वकानीचा (Disha Vakani) एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. या व्हिडीओत दिशा एका मुलाला तिच्या मांडीवर घेऊन तिची वेदनादायी व्यथा मांडत आहे. 

2/7

Disha Vakani

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतून दयाबेन या नावाने ही अभिनेत्री आज प्रसिद्ध झाली आहे.   

3/7

Disha Vakani

 गेल्या 4 वर्षांपासून अभिनेत्री शोपासून दूर आहे. गरोदरपणासाठी तिने मालिकेतून ब्रेक घेतला पण कन्यारत्न झाल्यानंतरही ती मालिकेत परतली नाही.   

4/7

Disha Vakani

या मालिकेतून ती प्रसिद्धझोतात आली आणि शिवाय या मालिकेतून तिने भरपूर संपत्ती मिळवली आहे. 

5/7

Disha Vakani

दिशा वकानी 'तारक मेहता'च्या एका एपिसोडसाठी 1 ते 1.50 लाख रुपये फी घ्यायची. 

6/7

Disha Vakani

याआधी दिशा 'जोधा अकबर', 'देवदास', 'मंगल पांडे' यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. 

7/7

Disha Vakani 1

अभिनेत्री दिशा वकानी हिचं मयूर पडियासोबत लग्न झालं आहे. ते चार्टर्ड अकाउंटंट असून त्या दोघांना एका कन्यारत्न आहे.