TATA च्या 6 लाखांच्या स्वस्त SUV चा धुमाकूळ; 30 महिन्यात 3.5 लाख लोकांनी खरेदी केली 'ही' कार

भारतीय बाजारपेठेत गेल्या काही वर्षांपासून एसयुव्हीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. स्पोर्टी लूक, कमी किंमत आणि जास्त मायलेज यामुळे या सेगमेंटमधील कारला पसंती मिळत आहे.   

Apr 18, 2024, 17:30 PM IST

भारतीय बाजारपेठेत गेल्या काही वर्षांपासून एसयुव्हीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. स्पोर्टी लूक, कमी किंमत आणि जास्त मायलेज यामुळे या सेगमेंटमधील कारला पसंती मिळत आहे. 

1/9

भारतीय बाजारपेठेत गेल्या काही वर्षांपासून एसयुव्हीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. स्पोर्टी लूक, कमी किंमत आणि जास्त मायलेज यामुळे या सेगमेंटमधील कारला पसंती मिळत आहे.   

2/9

या सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त एसयुव्ही टाटा पंचने नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. लाँच झाल्यापासून तिची लोकप्रियता फक्त वाढत चालली आहे.   

3/9

टाटा पंचला 18 ऑक्टोबर 2021 ला सर्वात आधी लाँच करण्यात आलं होतं. दरम्यान फक्त 30 महिन्यात कारच्या 35 लाख युनिट्सची विक्री झाली आहे.   

4/9

मागील मार्च महिन्यात कारच्या 17 हजार 547 युनिट्सची विक्री झाली आणि देशातील बेस्ट सेलिंग कार ठरली. मागील वर्षी मार्च महिन्यात 10 हजार 894 युनिट्सची विक्री झाली होती.   

5/9

टाटा पंच कार पेट्रोल इंजिनसह सीएनजी आणि इलेक्ट्रिक व्हर्जनमध्येही उपलब्ध आहे. याच्या सीएनजी व्हेरियंटमध्ये ड्युअल सिलेंडर टेक्नॉलॉजी मिळते. ज्यामुळे बूट स्पेसशी तडजोड करावी लागत आहे.   

6/9

एकूण चार व्हेरियंटमध्ये मिळणारी टाटा पंच 7 रंगात उपलब्ध आहे. यात 366 लीटरचा बूट स्पेस मिळतो.   

7/9

यामध्ये कंपनीने 1.2 लीटरचं पेट्रोल इंजिन दिलं आहे जे 88 PS ची पॉवर आणि 115 Nm चा टॉर्क जनरेट करते. या इंजिनला 5 स्पीड मॅन्यूअल आणि ऑटोमॅटिक गेअरबॉक्सशी जोडण्यात आलं आहे.   

8/9

याचं पेट्रोल मॅन्यूअल व्हेरियंट 20 किमी/लीटर, ऑटोमॅटिक व्हेरियंट 18.8 किमी/लीटर आणि सीएनजी 26.99 किमी/किग्रॅचा मायलेज देतं.   

9/9

यामध्ये कनेक्टेड कार तंत्रज्ञानासह 7 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले, 7 इंच सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट पॅनल, ऑटोमॅटिक एसी आणि क्रूझ कंट्रोलसारखे फिचर्स मिळतात.