Tata कंपनीने रचला इतिहास, Reliance ला मागे टाकत बनली नंबर१

Jan 26, 2021, 07:43 AM IST
1/4

TATA ने Reliance ला मागे

TATA ने Reliance ला मागे

 टाटा कंसल्टेंसी सर्विसेज (TCS) सोमवार ला रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीला मागे टाकत  मार्केट कॅपमध्ये अतिशय मौल्यवान कंपनी बनली आहे.  TCS चं मार्केट कॅप आज 169.9 अरब डॉलर म्हणजे जवळपास 12,43,540.29 करोड रुपयापेक्षा जास्त आहे. तेथेच रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेडचा व्यवहार घसरला असून 12,42,593.78 करोड रुपये पोहोचले आहे. 

2/4

TATA-RIL मधील अंतर फार कमी

TATA-RIL मधील अंतर फार कमी

TCS चा हा आनंद काही काळच टिकला. बाजाराच्या शेवटापर्यंत RIL पुन्हा एकदा मार्केट कॅपमध्ये नंबर १ ला राहिलं. मार्केट बंद होता होता टीसीएसचं मार्केट कॅप 12.17 लाख करोड रुपये होते. रिलायन्स मार्केट कॅप 12.76 लाख करोड रुपये राहिलं. हे अंतर फार कमी होतं.

3/4

RIL शेअरमध्ये 5.58 टक्के घसरण

RIL शेअरमध्ये 5.58 टक्के घसरण

रिलायन्सचे शेअर NSI मध्ये 5.58 टक्के घसरण पाहायला मिळत आहे. 1,935 पर्यंत पोहोचून बाजार बंद झाले. TCS शेअर मध्ये 0.15 टक्के घसरले असून 3,298 रुपयांना बंद झाले. 

4/4

TCS जगातील सर्वात मोठी IT कंपनी

TCS जगातील सर्वात मोठी IT कंपनी

Tata Group ची कंपनी Tata Consultancy Services (TCS) ने आपलं नाव चर्चेत ठेवलं आहे. TCS जगातील सर्वाधिक वॅल्यू असलेली सॉफ्टवेअर कंपनी  (most valued software company) बनली आहे.  TCS ने जगातील दिग्गज कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Accenture ला मागे टाकत इथपर्यंत पोहोचली आहे.