प्रेमासाठी टीम इंडियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूनी ओलांडल्या धर्माच्या सीमा

प्रेमाला कशाचंच बंधन नसतं ना वयाचं ना धर्माचं ना संस्कृतीचं...टीम इंडियाचे असे काही दिग्गज क्रिकेटर्स आहेत ज्यांनी धर्माच्याही सीमा ओलांडून आपलं प्रेम मिळवलं. त्यांनी विवाह केला. अशा क्रिकेटपटूंबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.   

Jun 02, 2021, 10:49 AM IST
1/7

जहीर खान-सागरिका घाटगे

जहीर खान-सागरिका घाटगे

टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खान आणि सागरीका घाटगे यांनी विवाह केला. 2017 मध्ये झालेल्या या विवाहाची खूप चर्चाही रंगली. त्यांनी कोर्ट मॅरेज केलं. जहीर खान मुस्लीम धर्माचा आहे तर सागरीका हिंदू धर्माची आहे. त्यांनी आपल्या प्रेमात कधीही धर्म आणि रितीरिवाज येऊ दिले नाहीत.

2/7

मोहम्मद कैफ-पूजा यादव

मोहम्मद कैफ-पूजा यादव

टीम इंडियाला विजय मिळवून देणाऱ्या मोहम्मद कैफने पत्रकार पूजा यादवसोबत विवाह केला. कैफ मुस्लिम तर पूजा हिंदू आहे. या दोघांनी 2011मध्ये विवाह केला होता. 

3/7

मंसूर अली खां पटौदी-शर्मिला टागोर

मंसूर अली खां पटौदी-शर्मिला टागोर

टीम इंडियाचे माजी कर्णधार मंसूर अली खां पटौदी आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर यांची लव्हस्टोरी सर्वांनाच माहिती आहे. पटौदी इस्लाम धर्माला मनणारे होते. तर शर्मिला टागोर हिंदू. दोघांनी 1969मध्ये विवाह केला. 

4/7

दिनेश कार्तिक-दीपिका पल्लीकल

दिनेश कार्तिक-दीपिका पल्लीकल

दिनेश कार्तिकचं वैयक्तिक आयुष्य खूप वेगळं आहे. त्यामध्ये अनेक अडचणी देखील आल्या. त्याने पहिल्यांदा निकिताशी लग्न केले, पण निकिताचे मुरली विजयवर प्रेम होतं. त्यामुळे कार्तिकने तिला घटस्फोट दिला.स्क्वॅश प्लेअर दीपिका पल्लीकर पुढे कार्तिकच्या आयुष्यात आली. 2015 साली दोघांनी लग्न केलं. दिनेश कार्तिक हिंदू असून दीपिका ख्रिश्चन आहे म्हणून या दोघांनी आपल्या दोन्ही प्रथानुसार लग्न केलं. 

5/7

मोहम्मद अजहरुद्दीन-संगीता बिजलानी

मोहम्मद अजहरुद्दीन-संगीता बिजलानी

टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन खूप चढउतारांनी भरलेले आहे. 1987मध्ये त्याने नौरीनशी लग्न केलं. परंतु दोघांना 1996 मध्ये घटस्फोट झाला. त्याच वर्षी अझरने बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानीशी लग्न केले पण ते लग्नही फार काळ टिकू शकलं नाही. या दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 

6/7

अजित अगरकर- फातिमा

अजित अगरकर- फातिमा

टीम इंडियाचे माजी गोलंदाज अजित आगरकर यांनीही आंतरधर्मीय विवाह केला. अजित हिंदू आहेत तर आणि त्यांची पत्नी फातिमा शिया मुस्लिम आहे. फातिमा त्यांच्या बहिणीची खास मैत्रीण होती. त्यामुळे या दोघांची ओळख झाली आणि एकमेकांवर प्रेम झालं. 

7/7

युवराज सिंह- हेजल कीच

युवराज सिंह- हेजल कीच

टीम इंडियाचा सुपरस्टार ऑलराऊंडर युवराज सिंहने 2015मध्ये अभिनेत्री हेजल कीचसोबत लग्नगाठ बांधली. हेजल ख्रिश्चन आहे तर युवराज सिख. लग्नानंतर हेजलनं आपलं नाव बदलून गुरबसंत कौर असं ठेवलं होतं.