Gautam Gambhir Net Worth: मोठं घर, महाग गाड्या आणि...; कोट्यवधी रूपयांचा मालक आहे टीम इंडियाचा नवा कोच गौतम गंभीर

Gautam Gambhir Net Worth: टीम इंडियाचा माजी सलामीवीर खेळाडू आणि कोलकाता नाईट रायडर्सचा प्रशिक्षक गौतम गंभीर याची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान गौतम गंभीरची दरवर्शाला किती कमावतो ते पाहूया.

| Jul 10, 2024, 11:40 AM IST
1/7

गौतम गंभीर हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक मानला जातो. 2024 मध्ये ₹265 कोटी ($32 दशलक्ष) अंदाजे निव्वळ संपत्ती असल्याची माहिती आहे. आपल्या क्रिकेट कारकिर्दीतून, ब्रँड प्रायोजकत्व आणि व्यावसायिक हितसंबंधांमधून प्रचंड संपत्ती कमावली आहे.

2/7

गंभीरच्या क्रिकेट कारकिर्दीशिवाय आणि कमर्शियल स्पॉनसरशिपव्यतिरिक्त गंभीरने अनेक ठिकाणी पैसेही गुंतवलेत. त्यांचा कपड्यांचा व्यवसाय आणि रेस्टॉरंट चेन असल्याची माहिती आहे. 

3/7

गौतम गंभीरचा पगार 36 लाख रुपये असल्याची माहिती आहे. केकेआरच्या माजी कर्णधाराचा स्टार स्पोर्ट्ससोबत कॉमेंट्रीचा करार असून तो अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये भाग घेतो. गंभीरकडे कमाईचे अनेक स्रोत आहेत. कॉमेंट्री आणि इतर क्रिकेट ब्रॉडकास्टिंग आणि मीडिया कॉन्ट्रॅक्टमधून तो 1.5 कोटींहून अधिक कमावतो.

4/7

गौतम गंभीर हा एंडोर्समेंटसाठी सर्वाधिक मागणी असलेला खेळाडू आहे. गंभीर MRF, Reebok, Royal Stag सारख्या अनेक ब्रँड्सचा एंडोर्सर आहे. 

5/7

याशिवाय गौतम गंभीर हा पिनॅकल स्पेशालिटी व्हेइकल्स (PSV) आणि क्रिकप्ले या फॅन्टसी गेमिंग प्लॅटफॉर्मचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे. रॅडक्लिफ लॅब्सने अलीकडेच क्रिकेटपटू गौतम गंभीरची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड केली आहे.

6/7

गौतम गंभीर हा दिल्लीचा रहिवासी असून याच ठिकाणी त्याचं घर आहे. गौतम गंभीरचे राजिंदर नगरमधील घर 15 कोटी रुपयांचे आहे.

7/7

गौतम गंभीरला गाड्यांचीही आवड असून त्याच्या कलेक्शनमध्ये मारुती सुझुकी SX4 (रु. 8 लाख), टोयोटा कोरोला (रु. 20 लाख) आणि महिंद्रा बोलेरो स्टिंगर (रु. 9 लाख) च्या कस्टमाइझ केलेल्या आहेत. याशिवाय गौतमकडे Audi Q5 (रु. 52 लाख) आणि BMW 530D (67 लाख रु.) सारख्या आलिशान कार आहेत. याशिवाय गौतम गंभीरकडे 75000 रुपयांची KTM बाइक आहे.