IND vs WI 2nd Test: मैदानावर उतरताच विराट कोहलीच्या नावावर होणार मोठा विक्रम, ठरणार चौथा भारतीय

Virat Kohli : भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान (India vs West Indies) गुरुवारपासून म्हणजे येत्या 20 तारखेपासून दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. पहिला कसोटी सामना जिंकत भारताने (Team India) 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा कसोटी सामना जिंकत वेस्टइंडिजला व्हाईटवॉश देण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. दुसरा कसोटी सामना विराट कोहलीसाठी (Virat Kohli) महत्त्वाचा ठरणार आहे. या सामन्यात त्याच्या नावावर मोठा विक्रम जमा होणार आहे. 

| Jul 18, 2023, 20:25 PM IST
1/5

भारत आणि वेस्टइंडिजदरम्यान क्विन्स पार्क ओव्हलवर दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात मैदानावर उतरताच विराट कोहलीच्या नावावर एक मोठा विक्रम जमा होणार आहे. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय क्रिकेटपटू ठरणार आहे. 

2/5

विराट कोहलीच्या क्रिकेट कारकिर्दीतला हा 500 वा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. याआधी केवळ तीन भारतीय क्रिकेटपटूंनी 500 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा टप्पा गाठला आहे. विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीनही फॉर्मेटमध्ये 499 सामने खेळला आहे. 

3/5

क्रिकेट जगतात अशी कामगिरी याआधी 9 क्रिकेटपटूंनी केली आहे. यात तीन भारतीयांचा समावेश आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर जमा आहे. तर यानंतर एम एस धोनी आणि राहुल द्रविडचा नंबर लागतो.

4/5

सचिन तेंडुलकर तब्बल 664 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. त्यानंतर श्रीलंकेचा महेला जयवर्धने (652), कुमार संगाकारा (594), सनथ जयसूर्या (586), रिकी पाँटिंग (560), एमएस धोनी (538), शाहिद आफ्रिदी (524), जॅक कॅलिस (519), राहुल द्रविड (509) या खेळाडूंच्या नावावर 500 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम आहे. 

5/5

विराट कोहलीने भारतीय क्रिकेट संघाकडून खेळताना 110 कसोटी सामन्यात 855 धावा केल्या आहेत. 274 एकदिवसीय सामन्यात विराटने 12898 धावा केल्या आहेत. तर 115 टी20 सामन्यात 4008 धावा त्याच्या नावावर आहेत. विराटने 2008 मध्ये एकदिवसीय सामन्या तर 2011 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तेव्हापासून म्हणजे गेली 12 ते 13  वर्ष तो भारतीय संघासाठी सातत्याने खेळतोय.