iPhone 14 ची किंमत आता आवाक्यात, iPhone 15 च्या लॅान्च आधी मोठं डिस्काउंट

iPhone 14 Deals: मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येकाचं स्वप्तन असतं iPhone वापरण्याचं. आयफोन वापरणं हे स्टेट्स मानलं जातं. पण प्रत्येकालाच आयफोन घेणं परवडतच असं नाही. आयफोनची किंमत सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. पण आता आयफोन प्रेमींसाठी मोठी बातमी आहे. iPhone 14 च्या किंमतीत मोठी घट झाली आहे. 

Jul 06, 2023, 18:38 PM IST
1/5

Apple कंपनी नवनवीन प्रोडक्ट बाजारात आणत असतं.  अॅपलने बाजारात आणलेल्या iPhone 14 ला मोठा प्रतिसाद मिळाला त्यानंतर आता कंपनी iPhone 15 लाँच करण्याच्या तयारीत आहे. 

2/5

iPhone 15 लवकरचं लॅान्च होणार आहे त्यामुळे iPhone 14 ची किंमत कमी झाली आहे. जर तुम्हाला iPhone 14 खरेदी करायचा आहे तर कमी किंमतीत तो खरेदी करु शकता.

3/5

iPhone 14 आणि iPhone 13 या फोनमध्ये एकच प्रोसेसर आहेत. पण iPhone 14 ची डिमांड जास्त आहे. . जर तुमचीही iPhone 14 विकत घेण्याची इछ्चा आहे तर जाणून कुठे स्वस्त मिळेल.

4/5

Flipkartवर iPhoneवर चांगला डिस्काउंट आहे. Flipkart वर  असणाऱ्या या ऑफरने ग्राहकांची चांगली बचत होणार आहे. iPhone 14 256 जिबी मिडनाइट मॅाडलची किंमत 79,999 रुपये आहे परंतु Flipkart वर iPhone 14च्या किमतीवर तब्बल 11 टक्के डिस्काउंट देण्यात येणार आहे. 

5/5

iPhone 14चा 256 जीबी मिडनाइट वेरिएंटसाठी ग्राहकांना 79.999 रुपये मोजावे लागतात पण जर ग्राहकांनी एक्सचेंज ऑफर वापरली तर त्यांना 36,999 रुपये पर्यंत सुट मिळू शक्ते. जर तुम्ही या ऑफरचा संपुर्ण फायदा घेता आला तर iPhone 14साठी तुम्हाला फक्त 36,999 रुपये मोजावे लागतील. परंतु ह्या एक्सचेंज ऑफरचा फायदा तुम्हाला मिळाला तरच तुम्हाला ही मोठी सुट मिळेल