लाँचआधीच लीक झाली iPhone 15 सीरिजची किंमत, वर्षभर फेडावे लागतील हफ्ते

iPhone 15 Pro Max Price: अॅपल लवकरच आपाल्या नव्या स्मार्टफोन (SmartPhone) सीरिजचं लॉन्चिंग करणार आहे. कंपनीचा iPhone 15 सीरिज सप्टेंबर महिन्यात बाजारात येण्याची शक्यता आहे. गेल्या सीरिजप्रमाणेच चार नवे फोनची ही सीरिज असणार आहे. यातले दोन फोन नॉन प्रो व्हेरिएंट असतीस. लाँचआधी या स्मार्टफोन्सची किंमत लीक झाली आहे.   

| Jul 28, 2023, 18:21 PM IST
1/5

आयफोन वापरणं प्रतिष्ठेचं मानलं जातं. पण महागड्या किंमतीमुळे प्रत्येकालाच आयफोन विकत घेता येत नाही. त्यातच आता Apple कंपनी सप्टेंबर महिन्यात आपली नवी सीरिज iPhone 15 बाजारात लाँच करणार आहे. चार फोनची ही सीरिज असून यात दोन मॉडेल स्टँडर्ड व्हेरिएंट तर दोन प्रो व्हेरिएंट असणार आहेत. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार iPhone 15 Pro आणि  iPhone 15 Pro Max ला उशीर लागणार आहे. 

2/5

iPhone 15 बाजारात विक्रिसाठी यायाल आणखी दोन महिन्यांचा अवधी आहे. पण त्याआधीच या फोनच्या किमतीबाबत खुलासा झाला आहे. एका रिपोर्टनुसार iPhone 15 Pro मॉडलची किंमत iPhone 14 Pro Max पेक्षाही महाग असेल. साधारम 200 डॉलरचा फरक असेल. 

3/5

सूत्रांच्या माहितीनुसार Apple आपल्या  टॉप ऑफ दि लाइन वेरिएंट 1200 डॉलर म्हणजे जवळपास 1,06,500 रुपये किंमतवीर लाँच करण्याची शक्यता आहे. भारतात याच फोनची किंमत जवळपास 1,39,000 असू शकते. तर iPhone 15 Pro ची किंमत 1099 डॉलर इतकी असून शकते.

4/5

iPhone 15 आणि iPhone 15 Plus ची किंमत अनुक्रमे 799 डॉलर (जवळपास 65,900 रुपये) आणि 899 डॉलर (जवळपास 73,700 रुपये)  इतकी असू शकते. म्हणजेच Pro व्हर्जन गेल्या फोनच्या तुलनेत जास्त महाग असतील. 

5/5

Pro व्हर्जनमध्ये जास्त अपडेट्स देण्यात आले आहेत. आधीच्या व्हेरिएंटच्या तुलनेत मोठी बॅटरी देण्यात आली आहे. याशिवाय 48 MP चा प्राइमरी कॅमेरा असण्याची शक्यता आहे