16 GB RAM असलेला जबरदस्त 5G फोन; किंमतही एकदम बजेटमध्ये

xiomi, oppo, vivo आणि samsung या कंपन्यांच्या बजेटफोनला टक्कर देण्यासाठी Tecno कंपनीने हा फोन लाँच केला आहे. या फोनमध्ये सर्व बेस्ट फिचर्स देण्यात आले आहेत. 

| Apr 29, 2023, 23:52 PM IST

Tecno Spark 10 5G  : Tecno कंपनीने आपला नवा बजेट फोन भारतीय बाजारपेठेत लाँच केला आहे. Tecno Spark 10 असे या फोनचे नाव आहे. हा  5G फोन आहे. सर्व लेटेस्ट आणि अपडेट फिचर्स या फोनमध्ये आहे. या फोनची किंमत 15 हजार रुपयांपर्यंत आहे. 

1/7

या फोनची किंमत  14 हजार 499 रुपये इतकी आहे. 2 मे पासून या फोनची विक्री सुरु होणार आहे, 

2/7

 या फोनमध्ये 8-मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी देण्यात आला आहे.

3/7

फोनमध्ये 5000mAh चा जबरदस्त बॅटरी ब‌ॅकअप आहे.  18W फास्ट चार्जिंगमुळे  फोन 50 मिनिटांत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होईल.

4/7

या फोनमध्ये AI लेन्ससह 50-मेगापिक्सल कॅमेरा आहे. 

5/7

फोनच्या 16 जीबी वेरिएंटमध्ये 8 जीबी रॅम देण्यात आला आहे.  8 जीबी व्हर्च्युअल रॅम सपोर्टच्या मदतीने रॅम 16 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.

6/7

Techno Spark 10 5G मध्ये 2.2 GHz MediaTek Dimensity 6020 octa core प्रोसेसर आहे. 

7/7

या फोनमध्ये  6.6-इंचाचा HD प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे.