close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

योगसाधना करणाऱ्या अभिनेत्रीचे टॉपलेस फोटो पुन्हा व्हायरल

Sep 14, 2019, 09:08 AM IST
1/5

सोशल मीडियाच्या माध्यमातून सेलिब्रिटी कायम त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या काही महत्त्वाच्या गोष्टींविषयी माहिती देत असतात. अनेकदा याच सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया पोस्ट या चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरतात. मग ते त्यांचं डाएट असो, मेकअप असो, त्यांचं राहणीमान असो किंवा आणखी काही. सध्याच्या घडीला अशीच एक अभिनेत्री तिच्या योगसाधनेच्या कौशल्याच्या माध्यमातून अनेकांनाच या विद्येविषयी आणखी जाणून घेण्यासाठी प्रेरित करत आहे. मुख्य म्हणजे तिचा योगसाधनेचा अंदाज सध्या जास्त चर्चेत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम) 

2/5

सोशल मीडियावर योगा करतानाचे टॉपलेस फोटो शेअर करणारी ही अभिनेत्री आहे, आश्का गोराडिया. नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये ती एक वेगळीच हस्तमुद्रा करताना दिसत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम) 

3/5

आश्काने तिचा हा टॉपलेस फोटो शेअर केला तेव्हा लगेचच त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली शिवाय काहींनी त्यावर कमेंट देण्यासही सुरुवात केली. आश्काने यापूर्वीही योगसाधनेचे तिचे काही फोटो व्हायरल केले आहेत, ज्याला अनेकांनीत पसंती दिली होती. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम) 

4/5

योगसाधनेवर प्रभुत्व मिळवणारी आश्का ही कलाविश्वातील तिच्या इतरही मित्रमंडळींना या विद्येसाठी आणि सुदृढ राहणीमानासाठी प्रेरित करत असते. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम) 

5/5

२००२ मध्ये अभिनय विश्वात पदार्पण करणाऱ्या आश्काने आतापर्यंत 'लागी तुझसे लगन', 'कुसूम', 'सिंदूर तेरे नाम का', 'विरुद्ध' आणि 'नागिन' अशा मालिकांमध्ये काम केलं आहे. शिवाय 'नच बलिये' आणि 'बिग बॉस' या रिऍलिटी शोमध्येही तिचा सहभाग पाहायला मिळाला होता. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)