Temple Bell: मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी घंटा का वाजवतात? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

हिंदू धर्मात मंदिराबाहेर घंटा बांधण्याची प्रथा आहे. ही प्रथा वर्षानुवर्षे सुरु आहे. मंदिराबाहेर घंटा लावलेल्या असतात. घंटा वाजवल्याशिवाय कुणी मंदिरात प्रवेश करत नाही. 

Jun 15, 2023, 19:07 PM IST

Temple Bell:  हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेला विशेष महत्व आहे. पूजा आणि आरती कराताना घंटा आवश्य वाजवली जाते. घंटा वाजवल्याशिवाय या पूजेला महत्व प्राप्त होत नाही. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी घंटा वाजवली जाते. इतकच नाही तर घरातील देवघरात देखील घंटा असते. घंटा वाजवल्या शिवाय पूजा पूर्ण होत नाही. मंदिरात घंटा वाजवण्यामागे धार्मिकच नाही तर वैज्ञानिक कारण देखील आहे. जाणून घ्या यामागचे शास्त्र.

1/7

घंटानादामुळे वातावरण प्रसन्न होते. तर, घंटानाद करताना हाताच्या हालचाली होतात. यामुळे ते शारिरीकदृष्ट्या फायदेशीर ठरते. घंटानाद करण्याचे शास्त्रीय आणि वैज्ञानिक फायदे आहेत. 

2/7

घंटानादामुळे वातावरण प्रसन्न होते. एक वेगळाच उत्साह संचारतो.

3/7

घंटा नादाच्या आवाजामुळे कीटक दूर होतात. यामुळे वातावरण शुद्ध होते. 

4/7

घंटा वाजवल्याने नकारात्मक उर्जेचा नाश होवून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

5/7

घंटा वाजवल्याने शरीरात चैतन्य निर्माण होते. यामुळे देवाच्या मूर्तीमध्ये चैतन्य जागृत व्हावे म्हणून मंदिर आणि मठांमध्ये घंटा वाजवल्या जातात असे  धर्मगुरू सांगतात.

6/7

धार्मिक श्रद्धेनुसार मंदिरातील घंटा वाजवल्याने वेगळ्या प्रकाराचे चैतन्य निर्माण होते. 

7/7

मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी घंटा वाजवली जाते. मंदिर देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात असो वा परदेशात, प्रत्येक मंदिरात घंटा पहायला मिळते. मंदिरात घंटा वाजवण्याची परंपरा नवीन नसून शतकानुशतके जुनी आहे.