ना डॉक्टर, ना इंजिनिअर ना बिझनेस, निवेदिका होऊन ही तरुणी बनली 232809920000 रुपयांची मालकीण

मिडीया क्वीन म्हणून ही महिला जगप्रसिद्ध आहे. अनेक टॉक शो, बेधडक मुलाखती या महिलेने घेतल्या आहेत. तिला अमेरिकेतील सर्वोत्तम नागरी सन्मान द प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडमने सन्मानित करण्यात आले आहे. या महिलेचे नाव आहे ओपरा विन्फ्रे.

| Jan 29, 2024, 12:49 PM IST

Oprah Winfrey Birthday: मिडीया क्वीन म्हणून ही महिला जगप्रसिद्ध आहे. अनेक टॉक शो, बेधडक मुलाखती या महिलेने घेतल्या आहेत. तिला अमेरिकेतील सर्वोत्तम नागरी सन्मान द प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडमने सन्मानित करण्यात आले आहे. या महिलेचे नाव आहे ओपरा विन्फ्रे.

1/9

ना डॉक्टर, ना इंजिनिअर ना बिझनेस, निवेदिका होऊन ही तरुणी बनली 232809920000 रुपयांची मालकीण

The heartbreaking but Inspiring Success Story of Oprah Winfrey net worth

ओपरा विन्फ्रे या त्यांच्या लोकप्रिय शो द ओपरा विन्फ्रे शोसाठी ओळखल्या जातात. त्यांचा हा कार्यक्रम 1986 ते 2011 पर्यंत टीव्हीवर सुरू होता. टॉक शोच्या व्यतिरिक्त ओपरा प्रोड्युसर, अभिनेत्री, समाजसेविकादेखील आहेत. 29 जानेवारी 1954 साली अमेरिकेतील मिसिसिपी येथे त्यांचा जन्म झाला. 

2/9

बुक ऑफ रुथ

The heartbreaking but Inspiring Success Story of Oprah Winfrey net worth

ओपरा यांनी लहानपणापासूनच संघर्ष केला आहे. आई अविवाहित असतानाच त्यांनी तिला जन्म दिला. बुक ऑफ रुथ या पुस्तकावरुन त्यांचे नाव ओरपा ठेवण्यात आले. मात्र, नंतर लोक त्यांना ओपरा नावाने हाक मारत. त्यामुळं पुढे त्यांचे नाव ओपराहेच रूढ झाले. 

3/9

आईनेही सोडलं

The heartbreaking but Inspiring Success Story of Oprah Winfrey net worth

ओपराच्या आईची आर्थिक स्थिती बिकट झाली तेव्हा त्यांनी तिला तिच्या आईच्या घरी सोडलं. मात्र, तिथेही तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अंग झाकण्यासाठी ती गोणीचा वापर करायची. गल्लीबोळात फिरुन दुसऱ्यांनी फेकलेलं अन्न तिला खावे लागायचे. जेव्हा कुठेच काही अन्न मिळायचे नाही तेव्हा ती चोरीदेखील करायची. 

4/9

हलाखीची परिस्थिती

The heartbreaking but Inspiring Success Story of Oprah Winfrey net worth

ओपराच्या आजीचे निधन झाल्यानंतर तिला पुन्हा तिच्या आईच्या घरी जावे लागले. तिची आई दुसऱ्यांच्या घरी मोलकरणीचे काम करायची. हलाखीची परिस्थिती जगत असतानाच तिच्यासोबत आणखी एक भयंकर प्रसंग घडला. 

5/9

सावत्र वडिलांनी सांभाळलं

The heartbreaking but Inspiring Success Story of Oprah Winfrey net worth

ओपरा घरात एकटीच असताना तिच्यावर अनेकदा बलात्कार झाला. या घटनेनंतर ती गर्भवती राहिली. मात्र, कमी वयातच गरोदर राहिल्याने तिने बाळ गमावले. या सगळ्या दुखःद घटनेनंतर एक चांगली गोष्ट घडली ते म्हणजे तिच्या आईने तिला तिच्या सावत्र वडिलांकडे पाठवले. 

6/9

स्पिकिंग टॅलेंट

The heartbreaking but Inspiring Success Story of Oprah Winfrey net worth

ओपराचे सावत्र वडिल तिच्यासाठी देवदूत ठरले. त्यांनी तिच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. शाळेत असताना तिने पब्लिक स्पिकिंग आणि नाटकात काम करण्यास सुरुवात केली. तिचे स्पिकिंग टॅलेंट आणि आवाज पाहून एका लोकल रेडिओ स्टेशनमध्ये तिला बातम्या वाचण्याची ऑफर आली. 

7/9

ब्युटी कॉन्टेस्ट

The heartbreaking but Inspiring Success Story of Oprah Winfrey net worth

टेनेट स्टेट विद्यापिठातून स्कॉलरशिप मिळवून तिने स्पीच कम्युनिकेशनमध्ये पदवी शिक्षण घेतले. 17 वर्षांची असताना तिने दोन ब्युटी कॉन्टेस्टही जिंकले. शिक्षण सुरु असतानाच तिला एका लोकप्रिय टिव्ही चॅनेलमध्ये नोकरी लागली. मात्र,मध्येच तिला या चॅनेलमधून काढून टाकण्यात आले. 

8/9

द ओपरा विन्फ्रे शो

The heartbreaking but Inspiring Success Story of Oprah Winfrey net worth

1886 मध्ये तिच्या आयुष्यात मोठा ट्विस्ट आला. तिने तिचा स्वतःचा द ओपरा विन्फ्रे शो सुरू केला. सुरुवातीला महिलांच्या समस्यांवर आधारित असलेला हा शो हळूहळू बदलत गेला. या शोमध्ये राजकारण, आरोग्य, अध्यात्म, करंट अफेअर या मुद्द्यांवरही चर्चा होऊ लागल्या. 

9/9

शक्तीशाली महिला

The heartbreaking but Inspiring Success Story of Oprah Winfrey net worth

ओपराचा हा तब्बल दोन दशके सुरू होता. 24 सीझनमध्ये तब्बल 5 हजार एपिसोड ब्रॉडकास्ट झाले. 2016च्या आकडेवारीनुसार ओपरा सर्वाधिक कमाई करणारी टिव्ही अभिनेत्री आहे. ओपरा विन्फ्रे यांची संपत्ती 208 अब्ज डॉलर्स इतकी आहे.  सर्वात शक्तीशाली महिला म्हणून फोर्ब्सच्या यादीतही त्यांनी मान मिळवला आहे.