सोन्याच्या ताटात जेवण, चांदीचा बेड; या आलिशान हॉटेलसाठी मोजावे लागतात लाखो रुपये

 तुम्हाला भारतातील सर्वात महागड हॉटेल माहिती आहे का? 

Jul 30, 2022, 15:53 PM IST

Luxurious Hotel In India: आलिशान आणि महागड्या हॉटेलमध्ये राहिला जायला कोणाला नाही आवडतं. भारतात अनेक असे आलिशान, आकर्षित अशी हॉटेल आहेत, तिथे जायचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. तुम्हाला भारतातील सर्वात महागड हॉटेल माहिती आहे का? आपण जेव्हा हॉटेलमध्ये रहायला जातो तेव्हा रुममधील अनेक गोष्टी आपल्याला भुरळ पाडतात. भारतातील एका हॉटेलमध्ये सोन्याचे नळ आहे. हो, ऐकून तुम्हालाही आर्श्चय वाटलं ना. आज आम्ही तुम्हाला या हॉटेलबद्दल सांगणार आहोत. या हॉटेल्सबद्दल तुम्हाला नक्कीच काही कल्पना नसेल. 

1/5

भारतात एक असं हॉटेल आहे जे भारतातच नाही तर जगातलं सगळ्यात महागड्या हॉटेलपैकी एक आहे. या हॉटेलच्या रुममधील बाथरुममध्ये सोन्याने मढवलेला नळ आहे. हे हॉटेल राजस्थानमधील जयपूरमध्ये आहे. त्याचं नाव आहे 'द राज पॅलेस'. हे आशियातील सर्वात महागडे हॉटेल म्हणून ओळखलं जातं.

2/5

 द राज पॅलेस या हॉटेलमध्ये एकूण 78 आलिशान खोल्या आहेत. या खोल्यामध्ये सुंदर असं संगमरवरी नक्षीकाम करण्यात आलं आहे. या हॉटेलला 2007 मध्ये राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार श्रेणीतील सर्वोत्कृष्ट हेरिटेज हॉटेलचा पुरस्कार मिळाला आहे. या हॉटेलमध्ये राहून गेलेने लोकं या हॉटेलचं खूप कौतुक करतात.   

3/5

या हॉटेलचं अजून एक वैशिष्ट्यं म्हणजे हॉटेलमध्ये रहायला आलेल्या पाहुण्यांना एका रात्रीसाठी चांदीच्या बेडवर झोपण्याची संधी दिली जाते. त्याशिवाय पाहुण्याला सोन्याचा ताटात जेवण दिलं जातं. तर या हॉटेलमधील रुम एकापेक्षा एक आलिशान आणि सुंदर आहेत. 

4/5

आतापर्यंत तुम्ही सर्वात महागड्या हॉटेलमध्ये राहण्यासाठी साधारण 15 ते 20 हजार रुपये दिले असतील. मात्र या हॉटेलमध्ये खास कोर्ट सूटमध्ये एक दिवस राहण्यासाठी 18 लाख रुपये द्यावे लागतात. एवढ्या पैशात तुमचा एक छोटा प्लॅट होऊ शकतो. 

5/5

'द राज पॅलेस' हॉटेलचं अजून एक खासियत म्हणजे हे हॉटेल मोठ्या पडद्यापासून छोट्या पडद्यावर झळकलं आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बोल बच्चन आणि अक्षय कुमारचा भूलभुलैयाचं शूटिंग या हॉटेलमध्ये झालं आहे. तर 'रतन का स्वयंवर' आणि 'झांसी की रानी' या टीव्ही मालिकांचेही शूटिंगही इथे झालं आहे.