तुमच्या नात्यामधील प्रेम वाढवायचं आहेत...मग 'या' 5 पदार्थांचं करा सेवन...

धकाधकीच्या जीवनात तुमच्या आणि तुमच्या पार्टनरमधील प्रेमाची संवाद हरवला आहे.

Jul 30, 2022, 10:55 AM IST

Love Hormone : जेव्हा तुम्ही प्रेमात पडता तेव्हा तुम्हाला तो आनंदाचा क्षण आठवतो का? धकाधकीच्या जीवनात तुमच्या आणि तुमच्या पार्टनरमधील प्रेमाची संवाद हरवला आहे. तुमच्या नात्यात कायम प्रेम राहवं असं  तुम्हाला वाटतं.  तुमच्यामधील प्रेमासाठी ऑक्सिटोसिन म्हणजे लव्ह हार्मोन महत्त्वाचे असतात. जर तुम्हाला वाटतं असेल की तुमच्यामधील प्रेमाची भावना अधिक वाढवावी तर तुम्ही काही पदार्थ खाऊन ती वाढवू शकता. ग्रेटर नोएडामधील जीआयएमएस हॉस्पिटलमधील प्रसिद्ध आहारतज्ञ्ज डॉ. आयुषी यादव यांनी काही पदार्थ खाल्ल्याने तुमच्या शरीरातील ऑक्सिटोसिन वाढवू शकता, असं सांगितलं आहे. चला तर जाणून घेऊयात त्या पदार्थांबद्दल 

1/5

डार्क चॉकलेट

चॉकेलट म्हटलं की, प्रत्येकांच्या तोंडाला पाणी सुटतं. पण आजकाल वजन वाढतं म्हणून आपण चॉकेलट खात नाही. पण तुम्ही डार्क चॉकलेट खाल्ल्याने वजनही वाढतं नाही. डार्क चॉकलेट खाल्ल्याने तुमचा मूड चांगला होता आणि मनात प्रेमाची भावना निर्माण होते.    

2/5

ब्रोकील

हिरव्या भाज्यांमधील ब्रोकीली ही ओराग्यासाठी खूप फायदेशीर असते. भरपूर प्रमाणात व्हिटॅमिनचं सोर्स ब्रोकील खाल्ल्याने मिळतात. ब्रोकील खाल्ल्याने तुमच्या शरीराला एनर्जी मिळते. तसंच तुमच्या शरीरात ऑक्सिटोसिन हॉर्मोनदेखील वाढतात.  

3/5

कॉफी

प्रेमी युगल आणि कॉफी हे गणित जणू ठरलेलं आहे. त्यामुळे की काय पण प्रेमी युगल हे सहसा आपल्याला कॉफी शॉपमध्ये दिसतात. कॉफीमध्ये असलेले कॅफीन ऑक्सिटोसिन हे आपल्या शरीरातील न्यूरॉन्सला एक्साइट करतात. त्यामुळे आपल्या प्रेमाच्या भावना रिचार्ज होतात आणि जोडपे प्रेमाच्या गोष्टी करतात. 

4/5

चिया सीड्स

चिया सीड्स हे वजन कमी करण्यासाठी जेवढे फायदेशीर आहे तेवढेच ते ऑक्सिटोसिन वाढवण्यासाठी फायद्याचं आहे. या बियांचे सेवन केल्यामुळे तुमच्यामधील प्रेमाची भावना एक्सााइट होते. त्यामुळे आपण आपल्या पार्टनरला आपल्या मनातील भावना उघडपणे सांगू शकता. ह्या बिया तुम्ही दुधासोबत किंवा पाण्याती अगदी कुठल्याही पदार्थासोबत खाऊ शकता. 

5/5

संत्र्याचा रस

या फळाच्या रसामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे संत्र्याचा रस घेतल्यामुळे अँटिऑक्सिडंट गुणधर्मांचा शरीरात सकारात्मक भावना निर्माण होते. तुमच्यामध्ये प्रेमाच्या भावना उत्तेजित होतात.  (Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)