जगातील एकमेव मंदिर महाराष्ट्रात, जिथे महादेवासमोर नंदी नाही!

चारधाम यात्रा सुरु असून केदारनाथ, बद्रीनाथ मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे. भगवान शंकराच्या मंदिरात गेल्यावर प्रथम तिथे नंदीचं दर्शन होतं मग शंकराच दर्शन घेतलं जातं. 

May 15, 2024, 16:30 PM IST
1/7

जगात एकमेव असं मंदिर आहे, जिथे महादेवासमोर नंदी नाही. हे मंदिर महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि धार्मिक शहरात आहे. 

2/7

नाशिकमधील पंचवटी परिसरात हे अद्भूत मंदिर आहे. गोदावरी नदीच्या तिरावर वसलेलं कपालेश्वर महादेव मंदिरात नंदी पाहिला मिळतं नाही. 

3/7

या ऐतिहासिक मंदिराबद्दल एक आख्यायिका आहे. महादेवांना ज्यावेळी ब्रह्महत्येचं पातक लागलं, त्यावेळी महादेवांनी या पातकापासुन स्व:ताची मुक्ती करुन घेण्यासाठी त्रिभुवन पालथं घातलं होतं. 

4/7

पण त्यांचं पातक काही दूर होत नव्हतं. या पातकापासून कसं सुटणार या चिंतेच असताना नंदीनं त्यांना नाशिकच्या रामकुंडावर आणलं. 

5/7

या रामकुंडात गोदावरी आणि अरुणा संगमात महादेवाने स्नान केलं. त्यानंतर महादेव पातक दूर होऊन ब्रम्हहत्येच्या दोषातून ते मुक्त झाले. 

6/7

पातकाच्या संकटातून नंदीने आपली मुक्तता केली यामुळे महादेवाने नंदीला गुरू मानलं. 

7/7

म्हणून या मंदिरात महादेवासमोर नंदीची स्थापना नाही. तर कपालेश्वर महादेवाच्या दर्शनात बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचं पुण्य मिळतं अशी मान्यता आहे. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)