वर्षाचे 12 महिने कोसळणारा महाराष्ट्रातील एकमेव धबधबा; पावसाळ्यात येतो स्वर्ग सुखाचा अनुभव

रत्नागिरी जिल्ह्यातील मार्लेश्वर येथे हा 12 महिने कोसळणारा महाराष्ट्रातील एकमेव धबधबा आहे. पर्यटका मोठ्यासंख्येने येथे भट देत असतात. 

Jul 15, 2023, 23:11 PM IST

Marleshwar Waterfall : पावसाळा आली सर्वांनाच धबधबे आकर्षित करतात. बहुतांश धबधबे हे पावसाळ्यात प्रावाहित होतात.  मात्र, महाराष्ट्रात एक असा धबधबा आहे जो वर्षाचे 12 महिने प्रवाहित असतो. हा धबधबा कोकणात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या  मार्लेश्वराच्या मंदिराशेजारी हा धबधबा आहे.  धारेश्वर नावाचा हा बारमाही वाहणारा नयनरम्य धबधबा आहे.

1/6

वर्षाचे बारा महिने हा धबधबा कोसळत असतो. पावसाळ्यात तर येथील दृष्य पर्यटकांना बेभान करुन टाकते. 

2/6

तीव्र उन्हाळा असला तरी या धबधब्यातून पाणी प्रवाहित होत असते. 

3/6

परिसरातील वनराई व शांतता या सुंदर धबधब्याच्या सुंदरतेत आणखी भर घालते.

4/6

सह्याद्रीच्या कातळातून सहस्त्र धारांनी फेसाळून वाहणारा धबधबा आपल्या नादमधुर ध्वनीने पर्यटकांना मोहून टाकतो. 

5/6

धबधब्यासमोर एक खोल डोह आहे ज्याच्या खोलाचा अद्यापही अंदाज आलेला नाही.

6/6

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या  मार्लेश्वराच्या मंदिराशेजारी हा धबधबा आहे. अनेक भाविक तसेच पर्यटक येथे भेट देत असतात.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x