TMKOC : हे माँ... माता जी... चाहत्यांची प्रतिक्षा संपली; अखेर दयाबेन परत येणार

'तारक मेहता का उल्टा चश्मा'  या मालिकेतून दयाबेन अर्थात अभिनेत्री दिशा वकानी गायब होते. दयाबेनच्या कमबॅकची वाट पाहत असलेल्या चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे. 

Jul 31, 2023, 16:36 PM IST

Disha Vakani Comeback in Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही छोट्या पदड्यावरील सर्वात लोकप्रिय मालिका आहे. मागील 14 वर्षांपासून हा शो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे. यातील सर्वच कॅरेक्टर हे एकापेक्षा एक सरस आहेत.  दयाबेन आण जेठालालची जोडी तर सुपरहिट आहे. दयाबेन अर्थात अभिनेत्री दिशा वकानीने या शो मधून ब्रेक घेतला होता. अखेर तब्बल सहा वर्षांनी दिशा वकानी पुन्हा एकदा या शोमध्ये कमबॅक करणार आहे. 

1/8

 'तारक मेहता का उल्टा चश्मा' हा  टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात पॉप्युलर शो आहे.  

2/8

शोचे निर्माते असित मोदी यांनी दयाबेन कमबॅक करणार असल्याची घोषणा आहे.  

3/8

दिशा वकानी प्रसूती रजेवर गेली होती. यानंतर पुन्हा तिने शोमध्ये कमबॅक केले नाही. यामुळे ती कधी परत येणार याची चाहत्यांना उत्सुकता होती.  

4/8

दिशा वकानीने ब्रेक घेतल्यानंतर  शैलेश लोढा, भव्य गांधी, राज अनडकट आणि नेहा मेहता आदी कलाकारांनी हा शो सोडला आहे. 

5/8

2017 मध्ये तिने शो मधून ब्रेक घेतला होता. यामुळे या मालिकेचे रेटिंग देखील कमी झाले होते.

6/8

 दिशा वकानीने 9 वर्ष दयाबेनचे पात्र साकारलं. दयाबेन या पात्राने आपला एक वेगळाच चाहतावर्ग तयार केला आहे. दयाबेन हा या शोचा प्राण आहे.  

7/8

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतून ब्रेक घेणारी दयाबेन 6 वर्षांनी पुन्हा एकदा कमबॅक करत आहे.  

8/8

 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मलिकेने नुकतीच 15 वर्ष पूर्ण केली आहेत.