'या' आजारांमुळे वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा कोणते आजार?

The risk of heart disease : सध्या थंडीचा हंगामा सुरु आहे. अशा वातावरणात अनेक आजारही उद्भवतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना हृदयविकाराशी संबंधित आजार आहेत, अशा लोकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. हृदयविकाराचा झटका ही एक समस्या आहे, जी सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही आजारांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

Feb 26, 2024, 16:32 PM IST
1/7

हृदयांच्या स्नायूंना रक्तपुरवठा कमी झाला की त्यांची कार्यक्षमता कमी होते. यामुळे हृदयाचे काम हे खालावते आणि त्यालाच आपण हार्ट अटॅक येणे असे म्हणतो.

2/7

 थंडीच्या दिवसांमध्ये शरीर उबदार ठेवण्यासाठी हृदयाला जास्त काम करावे लागते. यामुळे हृदयाची गती वाढते, रक्तदाब वाढतो. हृदयांच्या स्नायूची ऑक्सिजनची गरज देखील वाढते. थंडीच्या दिवसांमध्ये रक्तवाहिन्या आकुंचन पावतात यामुळे रक्तपुरवठा कमी होतो, असे डॉक्टर सांगतात.

3/7

मधुमेह

हा एक सामान्य आजार आहे. ज्यामुळे दररोज लाखो लोक उपचारासाठी रुग्णालयात येतात. हा एक प्रकारचा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. ज्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये हृदयाच्या धमन्यांमध्ये प्लेक जमा होतो. साधारणपणे या धमन्या लवचिक आणि मऊ असतात, परंतु त्यामध्ये घाण साचल्यामुळे त्या कडक आणि अरुंद होतात, त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.  

4/7

उच्च कोलेस्टरॉल

कोलेस्टेरॉल शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये आढळते, जे यकृताद्वारे तयार केले जाते. खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि जंक फूड खाल्ल्याने ही समस्या वाढते. यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होऊ शकतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

5/7

उच्च रक्तदाब

रक्तदाब ही अशी समस्या आहे, ती जास्त असल्याने त्याचा थेट परिणाम हृदयावर होतो. उच्च रक्तदाबामुळे, रक्तदाब 90/140 किंवा त्याहूनही वर पोहोचू शकतो, ज्यामुळे शरीरातील रक्ताच्या झडपांमध्ये रक्तदाब वाढतो. अशा परिस्थितीत हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.  

6/7

धमनी रुग्ण

धमन्यांमध्ये अडथळे आल्याने हृदयात रक्त नीट वाहत नाही, त्यामुळे धमन्यांमध्ये रक्ताचे डाग जमा होतात. यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघात होऊ शकतो. धमनी रोगांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

7/7

किडनी समस्या

किडनीच्या रुग्णांना हृदयविकाराचा सर्वाधिक धोका असतो. क्रॉनिक किडनी डिसीज (CKD) असण्याने हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते. अशा रुग्णांमध्ये किडनीपर्यंत रक्त पोहोचवण्यासाठी हृदयाला अधिक पंप करावा लागतो. अशा परिस्थितीत, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर आपल्या आहारात निरोगी आहाराचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.