अरबी समुद्रात नौदलाच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार

May 19, 2021, 22:21 PM IST
1/9

अरबी समुद्रात नौदलाच्या रेस्क्यू ऑपरेशनचे काही थरारक फोटो समोर आले आहेत. मृत्यू पाहिलेल्या लोकांच्या मनात नौदलाबद्दल,नौसैनिकांबद्दल काय भावना असतील....हे सांगणारे हे बोलके फोटो आणि दृश्य

2/9

आज सकाळी 125 जणांना घेऊन आयएनएस कोची ही युद्धनौका मुंबईत नौदल तळावर आली होती.

3/9

जोरदार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि खवळलेला समुद्र अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये नौदलाचे हे ऑपरेशन अजूनही सुरू आहे. 

4/9

विशेषतः रात्र झाल्यावर अंधार असतांना समुद्रात  लोकांना शोधणे, त्यांच्यापर्यंत पोहचणे आणि त्यांना पाण्याबाहेर काढणे हे किती अवघड आहे हे या फोटोच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे. 

5/9

समुद्रात अडकलेल्या लोकांनी नौदलाला केला सलाम, मानले आभार 

6/9

भर समुद्रात नौदलाच्या युद्धनौकांद्वारे आणखी काही लोकांचा शोध अजूनही सुरू आहे.

7/9

अनेक तास पाण्यात अडकलेली अवस्था, जोरदार वारा, खवळलेला समुद्र, तेवढाच भीतीदायक असा पावसाचा जोर.....जणू मृत्यू आसपास झडप घालण्यासाठी टपून बसला आहे अशी परिस्थिती

8/9

तेवढ्यात नौदलाच्या युद्धनौका येतात, हेलिकॉप्टरला पाण्यात तरंगणारी लोकं दिसतात

9/9

.आणखी मग थरार सुरू होता सुटकेचा... अक्षरशः मृत्यू गाठत असतांना नौदल देवदूत बनून येतं आणि अनेकांचे जीव वाचतात