'या' देशात लपवून ठेवलाय बुडालेल्या टायटॅनिक जहाजमधील खजिना; ज्याला सापडेल तो होईल मालामाल

बुडालेल्या टायटॅनिक जहाजमधील खजिना कुठे लपवून ठेवला आहे जाणून घेऊया....

Aug 15, 2024, 19:28 PM IST

Titanic Artefacts : 112 वर्षांपूर्वी टायटॅनिक जहाजाला जलसमधी मिळाली. टायटॅनिक जहाजाबद्दल अशी काही रहस्य आहेत जी आजही उलगडलेली नाहीत. टायटॅनिकमधील खजिन्याचा सगळेच शोध घेत आहेत. या देशात लपवून ठेवण्यात आला आहे. बुडालेल्या टायटॅनिक जहाजमधील खजिना.

 

1/10

जगभरातील अनेक देश आणि संशोधक समुद्रात बुडालेल्या टायटॅनिक जहाजमधील खजिन्याचा शोध घेत आहेत. 

2/10

अमेरिकेतील जॉर्जिया राज्यातील अटलांटा शहरात एक गुप्त ठिकाणी हा खजिना लपवून ठेवण्यात आला आहे. यात अनेक मौल्यवान वस्तुंचा समावेश आहे.  यात एक महागडे परफ्युम देखील आहे. यातून अजूनही सुंगध दरवळतो.  

3/10

टायटॅनिक जहाज बुडाल्यानंतर सप्टेंबर 1985 मध्ये अपघातस्थळावरून अवशेष काढण्यात आले. यातील खजिन्याचा देखील शोध घेतला जात आहे. 

4/10

दुर्घटनेनंतर  कॅनडापासून 650 किलोमीटर अंतरावर 3,843 मीटर खोलीवर जहाजाचे दोन भाग झाले आणि दोन्ही भाग एकमेकांपासून 800 मीटर दूर होते. 

5/10

टायटॅनिक बनवण्यासाठी सर्वोत्तम अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. टायटॅनिक जहाजाला ब्लू बँडदेखील मिळाला होता.

6/10

टायटॅनिक जहाजाच्या कॅप्टनला वाटेत येणाऱ्या हिमखंडांची क्लपना होती. तरी देखील त्याने जहाजाचा वेग कमी केला नाही. 

7/10

टायटॅनिक जहाज मोठ्या हिमनगाला धडकल्यामुळे जहाजाला छिद्र पडून जहाज बुडाले.   

8/10

14 आणि 15 एप्रिल 1912 च्या मध्यरात्री टायटॅनिक अटलांटिक महासागरात बुडाले. अपघाताच्या वेळी टायटॅनिक इंग्लंडमधील साउथॅम्प्टनहून अमेरिकेतील न्यूयॉर्ककडे 41 किलोमीटर प्रतितास वेगाने जात होते.

9/10

 टायटॅनिक जहाज बुडाल्यानंतर 1500 लोकांना जलसमाधी मिळाली.  आजपर्यंतची ही सर्वात मोठी जहाज दुर्घटना आहे.  

10/10

टायटॅनिकने 10 एप्रिल 1912 रोजी आपला पहिला प्रवास सुरू केला. 14 ते 15 एप्रिल दरम्यान या जहाजाला जलसमाधी मिळाली.