ह्रदयविकाराचा झटका येण्यापूर्वी दिसतात 'ही' 5 लक्षणे, पण तुम्ही दुर्लक्ष करू नका

Heart Symptoms In Afternoon : ह्रदयविकाराचा झटका येण्यापूर्वी दिसणारी लक्षणे हे जवळजवळ सामान्य असतात. पण काही लक्षणे ही वेगळी देखील असू शकतात. जाणून घ्या ह्रदयविकाराचा झटका येण्यापूर्वी कोणती लक्षणे दिसतात? 

| Aug 09, 2024, 15:00 PM IST
1/5

ह्रदयविकाराचा झटका

ह्रदयविकाराचा झटका येणे हे आजकाल सामान्य झाले आहे. मोठ्या प्रमाणात ह्रदयविकाराच्या घटना वाढल्या आहेत. ह्रदयविकाराचा झटका येण्याची अनेक  कारणे आहेत. 

2/5

छातीत जडपणा जाणवणे

ह्रदयविकाराचा झटका येण्यापूर्वी रुग्णांना त्यांच्या छातीत जडपणा जाणवतो. त्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष करु नका. अशी लक्षणे खूप गंभीर असू शकतात. दुपारी तुम्हाला छातीत जडपणा जाणवू लागला तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

3/5

मळमळ

जर दुपारच्या वेळी सूर्यप्रकाशामुळे तुम्हाला मळमळ होत असल्याच वाटत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. 

4/5

विनाकारण घाम येणे

ह्रदयविकाराचा झटका येण्यापूर्वी रुग्णांना दुपारीच्या वेळेस विनाकारण घाम येण्यास सुरुवात होते. तसेच या प्रकारचे लक्षण रात्री झोपेच्या वेळी देखील दिसून येतात. 

5/5

चक्कर येणे

सकाळी आणि रात्री हवामान थंड असते. त्यामुळे वेळी डोके कमी फिरते. पण जर दुपारी सूर्यप्रकाश जास्त असेल तर अशी लक्षणे ही ह्रदयविकाराची असू शकतात.