'या' आहेत जगातील सर्वात महागड्या अनपेक्षित गोष्टी

तुमच्याकडे अमाप पैसा आला किंवा एकाएकी धनाढ्य होण्याची संधी तुम्हाला मिळाली, तर है पैसा तुम्ही कोणत्या गोष्टींमध्ये गुंतवाल? अर्थात या प्रश्नावर प्रत्येकजण त्यांच्या सोईनुसार उत्तर देणार. पण, तुम्हाला माहितीये का; जगात अशी काही मंडळी आहेत ज्यांनी आपले छंद आणि आवडीनिवडी जोपासण्यासाठी म्हणून काही सर्वसामान्य गोष्टींवर कोट्यवधी रुपये खर्चिले आहेत. चला तर मग जाणून घेऊया जगातील अशाच काही अनपेक्षित महागड्या वस्तूंबद्दल.... 

Oct 28, 2020, 18:49 PM IST

तुमच्याकडे अमाप पैसा आला किंवा एकाएकी धनाढ्य होण्याची संधी तुम्हाला मिळाली, तर है पैसा तुम्ही कोणत्या गोष्टींमध्ये गुंतवाल? अर्थात या प्रश्नावर प्रत्येकजण त्यांच्या सोईनुसार उत्तर देणार. पण, तुम्हाला माहितीये का; जगात अशी काही मंडळी आहेत ज्यांनी आपले छंद आणि आवडीनिवडी जोपासण्यासाठी म्हणून काही सर्वसामान्य गोष्टींवर कोट्यवधी रुपये खर्चिले आहेत. चला तर मग जाणून घेऊया जगातील अशाच काही अनपेक्षित महागड्या वस्तूंबद्दल.... 

 

1/8

Graff Diamonds Hallucination Watch

जगातील सर्वात महागडं रत्नजडित असं हे घड्याळ. ग्राफ डायमंड्सचे संचालक लॉरेन्स ग्राफ यांची ही संकल्पना. जगातील अतिशय मौल्यवान अशा हिऱ्यांची 110 कॅरेटची सजावट हे घड्याळ USD 55 million इकत्या किमतीचं आहे.   

2/8

1963 Ferrari 250 GTO

वेदर टेकचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष डेविड मॅकनिल यांनी 2018 मध्ये USD 70 million इतकी किंमत मोजत 1963 फेरारी 250 जीटीओ विकत घेतली. 4153 GT क्रमांक असणारी ही जगातील सर्वात महागडी कार असल्याचं म्हटलं जातं.   

3/8

Bluefin Tuna

सुशीसाठी ओळखल्या जाणाऱ्या एका जपानी कोट्यधीशानं 612 पाऊंडच्या ब्लूफिन टुना माशासाठी तब्बल USD 3.1 million इतकी किंमत मोजली होती. टोक्योच्या मासळी बाजारात हा विक्रम रचला गेला होता. ही माशांची अतिशय दुर्मिळ प्रजाती आहे.   

4/8

Antilia, Mumbai

जगातील सर्वात महागडं घर कोणा व्यक्तीचं असेल तर ते आहे इंग्लंडच्या राणीचं, बकिंगघम पॅलेस. याची किंमत तब्बल USD 1 billion इतकी आहे. पण, तुम्हाला माहितीये का जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात महागडं घर कोणाचं आहे?  हे घर आहे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचं. मुंबईस्थित त्यांचं अँटिलिया नामक 27 मजली घर शिकागोमधील पर्किंस आणि विल या इंजिनियर्सनी साकारलं. ज्याची किंमत तब्बल USD 1-2 billion इतकी आहे.   

5/8

Manhattan Parking Spot

हल्लीच्या काळात घर खरेदी करणं सोपं झालं असून, आपल्यापाशी असणाऱ्या वाहनासाठी पार्किंगला जागा शोधणं मात्र तितकंच कठीण झालं आहे. तुम्हाला माहितीये का, जगातील सर्वात महागडा पार्किंग स्पॉट मॅनहॅटन या जगातील सर्वाधिक गजबजलेल्या भागात आहे. 42 Crosby कडून सोहो येथे असे दहा पार्किंग स्पॉट तयार करण्यात आले आहेत. येथील प्रत्येक पार्किंग स्पॉटची किमत 1 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 6.8 कोटी रुपये इतकी आहे.   

6/8

Leonardo da Vinci's Salvator Mundi

2017 मध्ये सौदीचे राजकुमार बदेर बिन अब्दुल्ला बिन मोहम्मद बिन फरहान अल सौद यांनी Leonardo da Vinci's Salvator Mundi चं चित्र Christie's auction मधून विकत घेतलं. यासाठी त्यांनी USD 450.3 million इतकी किंमत मिळाली. जाहीर लिलावात विकलं गेलेलं हे सर्वात महागडं चित्र ठरलं.   

7/8

Pasion Azteca, Platinum Liquor Bottle

जगातील सर्वात महागडा टकीला हा त्याच्या आकर्षक बाटलीमुळं तितका महागडा आहे. प्लॅटीनम आणि व्हाईट गोल्डच्या या बाटलीवर 6400 हिरे जडलेले आहेत.   

8/8

8. Falcon Supernova iPhone 6 Pink Diamond

जगातील सर्वात महागडा हिरेज़डित फोन 8. Falcon Supernova iPhone 6 Pink Diamond च्या रुपात सर्वांनाच थक्क करतो. याची किंमत USD 48.5 million इतकी आहे.