या आहेत बॉलिवूडच्या Single Mothers

May 10, 2020, 16:35 PM IST
1/10

उर्वशी ढोलकिया

उर्वशी ढोलकिया

टीवी शो `कभी सौतन कभी सहेली` आणि `कसौटी जिंदगी की` मधून ओळख मिळालेली बिग बॉस विजेती उर्वशी ढोलकियाने अगदी १६ व्या वर्षी लग्न केलं. लग्नानंतर तिला जुळं मुलं झाली. मात्र मुलांच्या जन्मानंतर सहा महिन्यातच तिने नवऱ्याशी घटस्फोट घेतला. 

2/10

सुचित्रा कृष्णमूर्ति

सुचित्रा कृष्णमूर्ति

`कभी हां कभी ना` सिनेमातील अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीने १९९९ मध्ये अभिनेता-निर्माता शेखर कपूरसोबत लग्न केलं. मात्र २००७ साली घटस्फोट घेतला. मुलगी कावेरीला एकटीला सांभाळलं. 

3/10

सारिका

सारिका

कमल हासनची दूसरी पत्नी अभिनेत्री सारिकाने लग्नाअगोदरच मुलगी श्रुती हासना जन्म दिला. १९८६ साली श्रुतीचा जन्म झाला आणि त्यानंतर १९८८ मध्ये कमल आणि सारिकाने लग्न केलं. त्यानंतर दुसरी मुलगी अक्षराचा जन्म झाला. २००४ साली हे दोघं एकमेकांपासून वेगळे झाले. 

4/10

अमृता सिंह

अमृता सिंह

सैफ अली खान आणि अमृता सिंहने १९९१ मध्ये लग्न केलं. त्यानंतर दो मुलांचा जन्म झाला. मात्र सैफने २००४ साली घटस्फोट घेतला. 

5/10

महिमा चौधरी

महिमा चौधरी

परदेस सिनेमातील अभिनेत्री महिमा चौधरीने २००६ साली आर्किटेक्ट बॉबी मुखर्जीसोबत लग्ने केलं. मात्र २०१३ साली वेगळे झाले. या दोघांना अरियाना नावाची मुलगी आहे.

6/10

कनिका कपूर

कनिका कपूर

अभिनेत्री कनिका कपूर देखील सिंगल मदर आहे. NRI राज चंडोकसोबत १९ व्या वर्षी तिने लग्न केलं. २०१२ साली वेगळे झाले. 

7/10

करिश्मा कपूर

करिश्मा कपूर

अभिनेत्री करिश्मा कपूरने२००३ साली बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केलं. मात्र २०१४ साली वेगळे झाले आणि २०१६ साली घटस्फोट घेतला. आता दोन्ही मुलांसोबत करिश्मा राहते. 

8/10

पूजा बेदी

पूजा बेदी

१९९० साली अभिनेता कबीर बेदी यांची मुलगी पूजा बेदीने बिझनेसमॅन फरहान फर्नीचरवालासोबत लग्न केलं. तेरा वर्षांनी २००३ साली या दोघांनी घटस्फोट घेतला. पूजाने मुलगी आणि मुलगा या दोघांना एकटीने सांभाळं.  

9/10

नीना गुप्ता

नीना गुप्ता

बॉलीवुड आणि टेलीविजन अभिनेत्री नीना गुप्ताने मुलगी मसाबाला एकटं सांभाळलं आहे. वेस्टइंडीज क्रिकेटर सर विवियन रिचर्ड्स यांची मुलगी असून मसाबा फॅशन डिझाइनर आहे.

10/10

पूनम ढिल्लो

पूनम ढिल्लो

अभिनेत्री पूनम ढिल्लोने १९८८ मध्ये सिनेमा निर्माता अशोक ठकेरियासोबत लग्न केलं. मात्र १९९७ मध्ये दोघं वेगळे झाले. पूनम यांची दोन मुलं आहेत. मुलगी पलोमा आणि मुलगा अनमोल यांना सिंगल मदर म्हणून सांभाळलं.