एलपीजी सिलिंडर स्वस्त तर हवाई वाहतूक महाग...आजपासून बदलले 'हे' नियम; आता खिशावर होणार परिणाम

Rule Change From September 1: ऑगस्टमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 200 रुपयांनी कमी केल्यानंतर इंधन कंपन्यांनी आता व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरवर मोठा दिलासा दिला आहे. 1 सप्टेंबरपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली आहे.

Sep 01, 2023, 09:24 AM IST
1/8

फक्त तीन दिवस IPO लिस्टिंग

IPO listing

शेअर बाजारातील कोणत्याही आयपीओचे सबस्क्रिप्शन बंद केल्यानंतर त्याच्या लिस्टिंगसाठी 6 दिवस लागत होते. परंतु आता सेबीने ते आता केवळ तीन दिवसांवर आणले आहे. त्यामुळे IPO लिस्टिंग आता केवळ तीन दिवसांत केली जाईल

2/8

म्युच्युअल फंड नियमांमध्ये बदल

Changes in Mutual Fund Regulations

सेबीने म्युच्युअल फंड योजनांच्या डायरेक्ट स्कीमसाठी एकमात्र एक्झिक्युशन प्लॅटफॉर्मसाठी नियामक फ्रेमवर्क सादर केले आहे. नवीन नियमांमुळे गुंतवणूकदारांना केवळ एक्झिक्युशन प्लॅटफॉर्म तसेच योग्य गुंतवणूकदार संरक्षण यंत्रणेद्वारे गुंतवणूक करणे सोयीचे होईल.  

3/8

क्रेडिट कार्डच्या नियमात बदल

Changes in credit card rules

अॅक्सिस बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 1 सप्टेंबर हा मॅग्नस क्रेडिट कार्ड असलेल्या युजर्ससाठी महत्त्वाचा दिवस आहे. मॅग्नस क्रेडिट कार्ड धारकांना यापुढे काही व्यवहारांवर सूट दिली जाणार नाही. तसेच, अशा कार्डधारकांना 1 सप्टेंबरपासून शुल्क भरावे लागेल.

4/8

टेक होम सॅलरीमध्ये बदल

Changes in Take Home Salary

आयकर विभागाकडून 1 सप्टेंबरपासून भाडेमुक्त निवासाच्या नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. या अंतर्गत नियोक्त्याकडून राहण्याचे भाडे मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता अधिक बचत करता येणार आहे. या नियमानुसार पगारातील कर कपात कमी असेल आणि कर्मचाऱ्यांना टेक होम सॅलरी जास्त मिळेल.

5/8

एटीएफ किंमतीत वाढ

Increase in ATF price

1 सप्टेंबरपासून जेट इंधन म्हणजेच ATF च्या किमतीत बदल करण्यात आला आहे. 1 सप्टेंबरपासून, जेट इंधन नवी दिल्लीत 1,12,419.33 रुपये झाले आहे, जे पूर्वी 98,508.26 रुपये प्रति किलो लिटर होते. म्हणजेच त्याची किंमत 13,911.07 रुपये प्रति किलोने वाढली आहे.

6/8

मोफत आधार कार्ड अपडेट

Free Aadhaar Card Update

UIDAI द्वारे मोफत आधार अपडेट करण्याची अंतिम मुदत आता 14 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही तारीख 14 जूनपर्यंत होती. तुम्ही माय आधार पोर्टलवर ते मोफत अपडेट करू शकता. मात्र या तारखेनंतर त्यावर 50 रुपये शुल्क आकारले जाईल.

7/8

2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची अंतिम मुदत

Deadline for exchange of Rs 2000 notes

तुमच्याकडे 2 हजार रुपयांची नोट असेल तर तुम्ही ती लवकर बदलून घ्या. कारण 30 सप्टेंबरनंतर तुम्ही ती बदलू शकणार नाही. 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यासाठी आरबीआयने 30 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे.

8/8

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात

Reduction in price of commercial LPG cylinders

1 सप्टेंबरला व्यावसायिक सिलिंडर वापरणाऱ्या व्यावसायिक ग्राहकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. मोदी सरकारने आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचे दर कमी केले आहेत. व्यावसायिक सिलिंडरची किंमत 157 रुपयांनी कमी झाली आहे.