चित्रपटांत झळकण्यापूर्वी नोकरी करायच्या 'या' बॉलिवूड अभिनेत्री

अभिनय क्षेत्रात आपलं करियर, काम सुरु करण्यापूर्वी अनेक अभिनेत्रींनी नोकरी केली आहे. 

Apr 20, 2020, 15:52 PM IST

कोणी होतं रिपोर्टर तर कोणी एअर हॉस्टेस...

1/6

अभिनेत्री दीपिका कक्कड अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी एअर होस्टेस होती. पण काही मेडिकल इश्यूजमुळे तिला नोकरी सोडावी लागली. नोकरी सोडल्यामुळे तिला दुसरी नोकरी नसल्याने ती चिंतेत होती. त्या दरम्यान दीपिकाची खास आणि वर्गमैत्रिण असलेल्या सोनाली कुलकर्णीने तिला ताण न घेण्याचा सल्ला दिला. आणि त्याचवेळी तिने दीपिकाला टीव्हीमध्ये अभिनय करण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला.

2/6

चित्रपटांमध्ये करियर करण्याआधी दीया, नीरज मल्टीमीडिया स्टूडिओ नावाच्या एका मीडिया फर्ममध्ये मार्केटिंग एग्जिक्यूटिव्ह म्हणून काम करत होती. त्यावेळी दीया मिर्झाला त्या कामासाठी 5 हजार रुपये इतका पगार मिळत होता.

3/6

बॉलिवूड अभिनेत्री आणि श्रीलंकन ब्यूटी क्विन जॅकलिन फर्नांडिस बॉलिवूडमध्ये करियर करण्यापूर्वी श्रीलंकेत टीव्ही रिपोर्टर म्हणून काम करत होती. यादरम्यान तिने तिथे सुरु असलेल्या राजकीय घडामोडीही कव्हर केल्या आहेत.

4/6

2008 मध्ये आलेल्या 'फॅशन' चित्रपटातून मुग्धा गोडसे प्रसिद्धीझोतात आली. मुग्धाने, पेट्रोल पंपवर नोकरी केली असल्याचं सांगितलंय.  

5/6

परिणीती चोप्राने यूकेमधील मॅनचेस्टर बिझनेस स्कूलमधून फायनान्स आणि इकोनॉमिक्समध्ये ट्रिपल ऑनर्सची ड्रिग्री घेतली आहे. शिक्षण पूर्ण करत असताना तिने मॅनचेस्टर यूके फुटबॉल क्लबसाठी कॅटरिंग विभागाची टीम लीडर म्हणून काम केलं आहे. त्याशिवाय तिने यशराज फिल्म्स स्टुडिओच्या विपणन अर्थात मार्केटिंग विभागात जनसंपर्क सल्लागार म्हणूनही काम केलं आहे.

6/6

सोनाक्षी सिन्हाने तिच्या करियरची सुरुवात एक कॉस्ट्यूम डिझायनर म्हणून केली होती. तिने 2005 मध्ये आलेल्या 'मेरा दिल लेके देखो' या चित्रपटासाठी वेशभूषा तयार केली होती.