...'या' अभिनेत्रींनी धर्म- अध्यात्मासाठी सोडलं कलाविश्व

Nov 23, 2020, 17:59 PM IST
1/6

...'या' अभिनेत्रींनी धर्म- अध्यात्मासाठी सोडलं कलाविश्व

कलाविश्वात अमुक एका सेलिब्रिटीच्या वाट्याला येणारं यश हे इतक्या सहजासहजी मिळालेलं नसतं. अशा परिस्थितीत काही सेलिब्रिटी मंडळी मात्र यशशिखरावर असतानाच या झगमगणाऱ्या विश्वाला रामराम ठोकून गेल्याचंही अनेकांनीच पाहिलं आहे. 

2/6

सना खान

सध्याच्या घडीला अभिनेत्री सना खान हिच्या नावाची चर्चा अशा कारणामुळं सुरु आहे. 'बिग बॉस' फेम अभिनेत्री सना खान हिनं मुफ्ती अनसशी नुकताच निकाह केला. धर्माच्याच कारणासाठी सनानं या कलाविश्वातून काढता पाय घेतला. 

3/6

झायरा वसिम

'दंगल', 'सिक्रेट सुपरस्टार' यांसारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या झायरा वसिम हिनं सेलिब्रिटी विश्वाला रामराम ठोकला. एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून तिनं हा निर्णय सांगितला. अल्लाहसाठी आपण या निर्णय़ावर पोहोचल्याचं ती म्हणाली होती.   

4/6

सोफिया हयात

'बिग बॉस' या रिऍलिटी शोमधून झळकलेली अभिनेत्री सोफिया हयात हिनंही मॉ़डेलिंग क्षेत्राला अलविदा करत नन होण्याचा निर्णय़ घेतला. किंबहुना तिनं आपलं नाव बदलत गिया सोफिया हयात असं केलं. 

5/6

अनु अग्रवाल

बऱ्याच वर्षांपूर्वी 'आशिकी' फेम अभिनेत्री अनु अग्रवालचा अपघात झाला होता. त्यातून बचावल्यानंतर अनुनं स्वत:ला अध्यात्म आणि योगाला समर्पित केलं. 

6/6

बरखा मदान

अभिनेत्री, निर्माती आणि मॉडेल असणाऱ्या बरखा मदाननं हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बौद्ध धर्मानं ती फार प्रभावित झाली. अखेर 2012 मध्ये बौद्ध नन होण्यासाठी तिनं करिअरला अलविदा केलं. आपलं नावही बदलत तिनं वेन या नावे नवी ओळख आपलीशी केली.