२०२० मध्ये 'या' क्रिकेटर्सनी सुरू केलं स्टार्टअप

Jan 27, 2021, 12:56 PM IST
1/6

विराट कोहली

विराट कोहली

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. 2020 या वर्षात विराटने दोन स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. तसेच फॅशन स्टार्टअप 'यूएसपीएल'मध्ये त्यांनी १९.३ करोड रुपयाची गुंतवणूक केली आहे. 

2/6

एमएस धोनी

एमएस धोनी

एमएस धोनी हल्लीच आपल्या फार्म हाऊसवर शेती करताना दिसला. यावर्षी त्याने शेतात भाजी आणि फळांची शेतील केली आहे. हे उत्पन्न त्याने दुबईत पाठवल्याची देखील माहिती मिळते. यासोबतच बंगलुरूमधील स्टार्टअप 'खाताबुक'मध्ये देखील गुंतवणूक केली आहे. 

3/6

अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणे

टीम इंडियाच्या टेस्ट टीमचे उपकॅप्टन अजिंक्य रहाणेने पुण्याच्या ऍग्रीटेक कंपनी असलेल्या 'मेरा किसान' मध्ये गुतवणूक केली आहे. 

4/6

गौतम गंभीर

गौतम गंभीर

क्रिकेटर आणि आताचे खासदार गौतम गंभीर यांनी यावर्षी स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअपमध्ये म्हणजे 'एफवायआय हेल्थ' (FYYHealth) मध्ये गुंतवणूक केली आहे.     

5/6

कपिल देव

कपिल देव

टीम इंडियाचे माजी कॅप्टन कपिल देव यांनी अनेक ठिकाणी गुंतवणूक केली आहे. यावर्षी देखील त्यांनी तेच केलं. २०२० मध्ये डीपटेक स्टार्टअप `हार्मोनाइजर इंडिया` (Harmonizer India)  मध्ये गुंतवणूक केली आहे. कपिल देवने यामध्ये किती गुंतवणूक केली याची अद्याप माहिती नाही. 

6/6

सौरव गांगुली

सौरव गांगुली

भारतीय संघाचे माजी कॅप्टन आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौगव गांगुलीने ऍडटेक स्टार्टअप `क्लासप्लस` (Classplus) मध्ये गुंतवणूक केली आहे. यामध्ये किती गुंतवणूक केली याची माहिती नाही.