Healthy Diet: कोरोनानंतरचा अशक्तपणा दूर करण्यासाठी 'हे' पदार्थ करतील मदत
चांगला आहार अशक्तपणावर मात करण्यास उपयुक्त ठरतो.
मुंबई : कोरोनामुक्त झाल्यानंतर देखील लोकांना एका तक्रारीचा सामना करावा लागतो तो म्हणजे अशक्तपणाचा...कोरोनाच्या उपचारांमुळे अनेकजणांना थकवा तसंच अशक्तपणा जाणवला आहे. अशावेळी हेल्दी डाएट म्हणजे म्हणजे चांगला आहार अशक्तपणावर मात करण्यास उपयुक्त ठरतो. कोविडशी लढत असताना आपलं शरीर एकाच वेळी बर्याच गोष्टी करतं. त्यामुळे जरी बरं झालं तरीही आपल्या शरीरासाठी पोषकतत्त्व आवश्यक आहे.
चांगला आहार, खास नाश्ता तुमचा अशक्तपणा दूर करण्यास आणि उर्जा वाढवण्यास मदत करतं. यासाठी तुमच्या नाश्त्यामध्ये प्रोटीन, कार्बोहाड्रेट, झिंक, व्हिटॅमीन यांचा समावेश केला गेला पाहिजे. तर जाणून घेऊया कोणते पदार्थ तुमचा अशक्तपणा दूर करण्यास मदत करतील