ना दिल्ली, ना मुंबई, 'या' रेल्वे स्टेशनवर आहेत सर्वाधिक प्लॅटफॉर्म?

देशात 7 हजारांहून अधिक रेल्वे स्थानके आहेत. यापैकी काही रेल्वे स्थानकावर आहेत अनेक खास रेकॉर्ड.

| Sep 24, 2024, 18:01 PM IST
1/6

सर्वात जास्त प्लॅटफॉर्म

देशात सर्वात जास्त प्लॅटफॉर्म असण्याचा विक्रम करणारे एक रेल्वे स्टेशन देखील आहे. ते म्हणजे पश्चिम बंगालचे हावडा रेल्वे स्टेशन. 

2/6

हावडा रेल्वे स्थानक

पश्चिम बंगालमधील हावडा रेल्वे स्थानकात 23 प्लॅटफॉर्म आहेत. देशातील इतर कोणत्याही रेल्वे स्थानकावर यापेक्षा जास्त प्लॅटफॉर्म नाहीत. 

3/6

सियालदह रेल्वे स्टेशन

हावडानंतर सियालदह रेल्वे स्टेशन दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे 21 प्लॅटफॉर्म आहेत. 

4/6

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हे तिसऱ्या क्रमांकावर आहे. या ठिकाणी 18 प्लॅटफॉर्म आहेत. तर नवी दिल्ली आणि दिल्ली येथे 16 प्लॅटफॉर्म आहेत. 

5/6

अहमदाबाद रेल्वे स्थानक

दिल्लीनंतर गुजरातमधील अहमदाबाद रेल्वे स्थानक आणि पश्चिम बंगामध्ये खरगपूर रेल्वे स्थानक आहे. या दोन्ही ठिकाणी 12 प्लॅटफॉर्म आहेत. 

6/6

कानपूर रेल्वे स्थानक

त्यानंतर उत्तर प्रदेशातील कानपूर रेल्वे स्थानकावर 10 प्लॅटफॉर्म आहेत. बेंगळुरू सिटी रेल्वे स्थानकावर देखील 10 प्लॅटफॉर्म आहेत.