'या' 3 मुस्लीम अभिनेत्रींनी भावंडांसोबत साजरी केली रक्षाबंधन! एक तर थेट सावत्र आईच्या घरी गेली अन्...

आज संपूर्ण देशात रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात येत आहे. अशात बॉलिवूडमधील मुस्लिम कलाकारांनी देखील आनंदानं भावा-बहिणीचा हा खास दिवस साजरा केला आहे. इतकंच नाही तर हे सेलिब्रिटी कोण आहेत आणि त्यांनी हा खास दिवस कसा साजरा केला हे आज आपण जाणून घेणार आहोत. 

Diksha Patil | Aug 19, 2024, 18:28 PM IST
1/7

सगळ्यात आधी सारा अली खाननं तिच्या भावांसोबत रक्षाबंधन हा सण साजरा केला आहे. यावेळी सारानं पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर इब्राहिमनं पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि जेहनं निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. 

2/7

यावेळी तैमूर तिथे उपस्थित नव्हता. तर त्यासाठी सारानं पोस्ट शेअर करत त्यांची खूप आठवण आली असं म्हटलं. 

3/7

सोहा अली खाननं सैफ अली खानला राखी बांधली. सोहानं यावेळी मरून रंगाची कुर्ती परिधान केली होती तर सैफनं गडद रंगाचा कुर्ता परिधान केला होता. 

4/7

तर सोहानं राखी बांधल्यानंतरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तर ते राखी फ्लॉन्ट करताना दिसले. 

5/7

सोहानं तिची लेक इनायान तैमूर आणि जेहसोबत रक्षाबंधन कशी साजरी केली त्याचे फोटो शेअर केले आहेत. 

6/7

गौहर खाननं तिच्या भावाला राखी बांधली. त्यावेळी तिनं गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर कॅमेऱ्या समोर ते दोघे आनंदानं हसताना दिसले. 

7/7

खरंतर गौहरनं 3 दिवस आधीच रक्षाबंधन साजरी केली. त्याचे फोटो तिने आधीच शेअर केले होते.   

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x