भुताच्या भूमिकेत सगळ्यांना घाबरवणार 'ही' अभिनेत्री

नायराच्या मते एका कलाकाराला, सर्व प्रकारच्या भूमिकेला न्याय देण्याची संधी मिळायला हवी.

May 21, 2019, 23:47 PM IST

मुंबई : अभिनेत्री नायरा बॅनर्जी 'दिव्य दृष्टी' शोमध्ये नकारात्मक भूमिका साकारणार आहे. ही भूमिका साकारताना तिला आनंद होत असल्याचे तिने सांगितले आहे. शोमध्ये ती दिव्या या भूमिकेला न्याय देताना दिसणार आहे. दिव्या ही एक अशी मुलगी आहे, जिच्याकडे भविष्य बदलासाठी अलौकिक शक्ती आहे. आता ती एक राक्षसी पिशाच बनली आहे. तिचा एकमेव हेतू आहे, आपल्या सख्या बहिणीस म्हणजे दृष्टिला नष्ट करण्याचा. याआधी नायराने कधीही नकारात्मक भूमिका साकारली नाही. तिच्या मते एका कलाकाराला, सर्व प्रकारच्या भूमिकेला न्याय देण्याची संधी मिळायला हवी. 

1/5

'दिव्य दृष्टी' शोची कथा दोन वेगळ्या झालेल्या बहिणींच्या आयुष्याभोवती फिरत आहे. ज्यांचे नाव दिव्य आणि दृष्टी असे आहे.

2/5

दृष्टीला भविष्यात येणाऱ्या संकटांची चाहुल लागते, तर दिव्य ते संकट आपल्या अलौकीक शक्तीच्या मदतीचे दूर करते.  

3/5

नायराने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 'कमाल, धमाल, मालामाल' आणि 'वन नाइट स्टॅंड' या हिंदी चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत. 

4/5

त्याचप्रमाणे तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. नायराने सांगितले की, सहा वर्षांपूर्वी तिला भविष्यात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीची चाहुल लागत होती. 

5/5

सहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा तिला काही गोष्टींचा भास होत होता. रात्री १२ च्या सुमारास ती खिडकीत बसल्यानंतर तिला आत्मा दिसायचा आणि त्यांच्या मधील संवाद ऐकायला यायचा. माझा अपघात झाल्यानंतर अशा गोष्टींचा भास होण्याचे बंद झाल्याचे नायराने सांगितले.  अर्थातच हे सत्य घटनेवर आधारीत नाही, हे केवळ एका मालिकेचे कथानक आहे.