180 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये निधन, एकदा तर खरंच मरताना लोक वाजवत होते टाळ्या

कोणतीही मालिका असो किंवा मग चित्रपट सगळ्यात खलनायक असणं हे महत्त्वाचं असतं. कारण शेवटी त्या खलनायकाचं काय होतं ते जाणून घेण्यासाठी सगळ्यांना उत्सुकता असते.  आज आपण अशाच एका खलनायकाविषयी जाणून घेणार आहोत ज्याचे अनेक चित्रपटांमध्ये निधन झाले आहे. इतक्यावेळा त्या खलनायकाचे निधन झाले की त्याचा आकडा हा 100 च्या पार गेला आहे. हा खलनायका कोणी दुसरं नाही आशिष विद्यार्थी आहे. 

| Jun 20, 2024, 17:48 PM IST
1/7

आशिष विद्यार्थी

आशिष विद्यार्थी हे लोकप्रिय खलनायकांपैकी एक आहेत. त्यासोबत ते मल्टी टॅलेन्टेड स्टार्स देखील आहेत. ते प्रत्येक भूमिकेला न्याय देतात.

2/7

पहिल्याच चित्रपटासाठी मिळाला अवॉर्ड

आशिष विद्यार्थी यांना त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी अर्थात द्रोहकालसाठी नॅशनल अवॉर्ड मिळाला होता. त्यांना सहाय्यक भूमिकेसाठी हा पुरस्कार मिळाला होता. 

3/7

प्रत्येक चित्रपटाच्या शेवटी निधन

जवळपास सगळ्याच चित्रपटांमध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्यासोबत इतक्या वेळा निधनाचे सीन शूट करण्यात आले आहेत की हा आकडा 100 च्या पार आहे. त्याचा आकडा हा 182 पेक्षा जास्त आहे. 

4/7

मरता मरता वाचलेत

2014 मध्ये जेव्हा ते बॉलिवूड डायरीसाठी शूट करत होते. तेव्हा आशिष विद्यार्थी हे शिवनाथ किनाऱ्यावर महमरा एनीकटवर शूटिंग करत होते. त्यांना इथे पाण्यात उतरायचे असते. पण ते जास्त पाण्यात गेले आणि बुडू लागले. 

5/7

मात्र, जवळपास उपस्थित असलेल्या लोकांपैकी कोणी वाचवायला आलं नाही. सगळ्यांना वाटलं की हे कोणत्या सीनचा भाग आहे. काही लोक टाळ्या वाजवत त्यांची स्तुती करत होते. त्यानंतर तिथे उपस्थित असलेले एक पोलिस त्यांच्या जवळ आले आणि त्यांनी त्यांचा जीव वाचवला. 

6/7

शूटिंग दरम्यान, आशिष विद्यार्थी आणि त्यांच्या सह-कलाकारांचा पायऱ्यांवरून पाय सटकला होता. तिथे उपस्थित असलेले पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांचा जीव वाचवला. 

7/7

ही तिच जागा आहे जिथे पहिल्या दोन वर्षात बुडल्यानं 21 लोकांचे निधन झाले होते. पुलगाव ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार 2013 मध्ये दहा लोकं आणि 2014 मध्ये 11 लोकांचे निधन झाले होते.