आज असा आहे...'करिश्मा का करिश्मा'

Jun 18, 2019, 16:38 PM IST
1/8

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध मालिका 'करिश्मा का करिश्मा'मधून झनक शुक्ला घरां-घरांत पोहचली. या मालिकेत तिने रोबोटची भूमिका साकारली होती.

2/8

एकेकाळी आपल्या अभिनयाने आणि गोड चेहऱ्याने झनक शुक्लाने सर्वांवरच 'करिश्मा' केला होता.

3/8

झनकने लहानपणी शाहरुख खानसोबतही 'कल हो ना हो' चित्रपटातून भूमिका साकारली होती.

4/8

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वाची आवडती असलेली 'करिश्मा' आज मात्र अभिनय क्षेत्रापासून लांब आहे.

5/8

सध्या झनक तिच्या शिक्षणावर लक्षकेंद्रित करत आहे.

6/8

कलाक्षेत्रापासून झनक लांब असली तरी ती सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर ती नवीन-नवीन फोटो-व्हिडिओ शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर झनकचे अनेक चाहते आहेत.

7/8

झनक तिच्या कुटुंबासोबत, मित्र-परिवारासोबत ठिक-ठिकाणी फिरतानाचे अनेक फोटो पोस्ट करत असते.

8/8

झनकने साकारलेली रोबोट करिश्माची भूमिका आजही अनेकांच्या मनात कायम घर करुन आहे.