Gateway of India: मुंबईतील 'गेट वे ऑफ इंडिया'चे अस्तित्व धोक्यात; पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणात धक्कादायक खुलासा

Gateway of India in Danger: मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाला तडे गेले आहेत. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हा खुलासा झालाय. दुरूस्तीसाठी 8 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

Mar 08, 2023, 21:27 PM IST

Gateway of India in Danger: भारताचं प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडियाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. गेट वे ऑफ इंडियाच्या वास्तूला तडे गेले आहेत. शंभर वर्ष जुना ऐतिहासिक वारसा असलेल्या गेट वे ऑफ इंडियाच्या डोमच्या आतल्या भागाला तडे गेल्याचं स्पष्ट झाले आहे. पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

1/9

गेटवेच्या दुरूस्तीसाठी सुमारे 8 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली

2/9

1924 मध्ये गेट वे ऑफ इंडियाचं बांधकाम पूर्ण झालं होतं.

3/9

ऐतिहासिक वारसा असलेल्या गेट वे ऑफ इंडियाच्या डोमच्या आतल्या भागाला तडे गेले आहेत. 

4/9

गेट वे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. 

5/9

गेट वे ऑफ इंडिया पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. 

6/9

1924 मध्ये गेट वे ऑफ इंडियाचं बांधकाम पूर्ण झालं.

7/9

 देशभरातीलच नव्हे तर परदेशातील पर्यटकही मुंबईतील 'गेट वे ऑफ इंडिया' भेट देण्यासाठी येतात.  

8/9

 मुंबईतील 'गेट वे ऑफ इंडिया' ची निर्मीती का करण्यात आली यामागे देखील एक इतिहास आहे. 

9/9

स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये  मुंबईतील 'गेट वे ऑफ इंडिया' च्या वास्तूबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे.