ईडी कार्यालयात अनिल अंबानी यांची कसून चौकशी; फेमा कायद्याचे उल्लंघन

   देशातील प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांची आज ईडी कार्यालयात कसून चौकशी झाली. सकाळी दहा वाजता ते ईडी कार्यालयात  चौकशीसाठी दाखल झाले होते. अनिल अंबानी हे 7 ते 8 तासानंतर ईडी कार्यालयातून बाहेर पडले. अंबानी फेमा संबंधित प्रकरणात त्यांची ईडी मार्फत चौकशी सुरु आहे. 

Jul 03, 2023, 23:11 PM IST

Anil Ambani ED Enquiry:   देशातील प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांची आज ईडी कार्यालयात कसून चौकशी झाली. सकाळी दहा वाजता ते ईडी कार्यालयात  चौकशीसाठी दाखल झाले होते. अनिल अंबानी हे 7 ते 8 तासानंतर ईडी कार्यालयातून बाहेर पडले. अंबानी फेमा संबंधित प्रकरणात त्यांची ईडी मार्फत चौकशी सुरु आहे. 

1/8

देशातील प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani)  हे अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या (ED) चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. 

2/8

अनिल अंबानींच्या कंपन्या पायाभूत सुविधा, ऊर्जा, विमा, संरक्षण आणि सिनेमा क्षेत्रात कार्यरत होत्या. त्यांच्या या कंपन्यांना एकापाठोपाठ आर्थिक फटका बसला. एरिक्सन खटल्यात अनिल अंबानींच्या दाव्याची रक्कम मुकेश अंबानींनी भरल्यानं त्यांची अटक टळली होती.

3/8

 मुकेश यांच्या वाट्याला रिलायन्स इंडस्ट्रिज आली. तर रिलायन्स इन्फोकॉमची धुरा अनिल अंबानींनी सांभाळली.

4/8

2006 मध्ये मुकेश आणि अनिल अंबानी या दोन भावांनी उद्योगात वाटणी केली. 

5/8

सप्टेंबर 2022 मध्ये मुंबई हाय कोर्टाने 420 कोटी रुपयांच्या करचोरी प्रकरणात अनिल अंबानींना दिलासा दिला होता.

6/8

यापूर्वी येस बँकेच्या कर्ज प्रकरणात बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांना अटक झाली होती. या प्रकरणात अनिल अंबानी यापूर्वी 2020 मध्ये ईडीसमोर हजर झाले होते. 

7/8

चौकशीसाठी अनिल अंबानी सकाळीच मुंबईतील ईडी कार्यालयात हजर झाले होते. सायंकाळी 9 नंतर ते ईडी कार्यालयातून बाहेर पडले. 

8/8

परकीय चलन व्यवस्थापन कायदा म्हणजेच फेमा (FEMA) कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनिल अंबानी यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे.