Google Chrome च्या 250 कोटी युजर्सचा डेटा असुरक्षित... असा करा सुरक्षित

तुम्ही Google Chrome वापरत असाल तर थांबा... भारत सरकारने Google Chrome युजर्ससाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे. त्यामुळे गुगल क्रोम वापराताना खालील काळजी घ्या....

Jan 15, 2023, 19:12 PM IST
1/5

google chrome users

जगभरासह भारतातही गुगल क्रोम वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशातच सायबर सुरक्षा यंत्रणेने Google Chrome आणि Chromium वर सुरु असलेल्या ब्राउझरमध्ये काही त्रुटी शोधून काढल्या आहेत. या त्रुटी युजर्ससाठी धोक्याची घंटा ठरत आहेत.

2/5

Google Chrome attack

250 कोटींपेक्षा जास्त युजर्सचा डेटा धोक्यात आल्याने भारत सरकारच्या एका संस्थेकडून इशारा देण्यात आलाय. डेकस्टॉपवर गुगल क्रोम वापरणाऱ्यांसाठी हा इशारा देण्यात आलाय. या इशाऱ्यानुसार हॅकर्स तुमच्या डेकस्टॉपमध्ये सहजतेने प्रवेश करु शकतात.

3/5

chrome news

हा इशारा देणाऱ्या संस्थेच्या मते ब्राउझरमधील त्रुटीमुळे संवेदनशील फाइल्सची चोरी होऊ शकते.  फाइल सिस्टमशी ब्राउझर ज्या प्रकारे संवाद साधतो त्याद्वारे ही त्रुटी शोधण्यात आली. ही ब्राउझरची प्रक्रिया सिमलिंकशी संबंधित सामान्य चुकांच्या मदतीने डेटा चोरीला परवानगी देते.

4/5

google chrome news

Imperva Red एक सिमलिंक किंवा सिम्बॉलिक लिंक फाइल म्हणून काम करते. याद्वारे ऑपरेटिंग सिस्टमला फाईलला लिंक्ड म्हणून हाताळण्याची परवानगी मिळते. शॉर्टकट तयार करण्यासाठी, फाइल पाथ देण्यासाठी सिमलिंक वापरता येऊ शकते.

5/5

Google chrome

त्यामुळे यापासून वाचण्यासाठी युजर्सनी गुगल क्रोम अपडेट करणे आवश्यक आहे. तसेच तुम्ही गुगल क्रोमचे तुम्ही जुने व्हर्जन वापरत असाल तर तुम्ही लगेचच अपडेट करुन घ्यावे.