कोरोनाशी लढण्यासाठी अझीम प्रेमजींसह 'या' व्यक्तींकडून कोट्यवधींची आर्थिक मदत

May 10, 2020, 10:18 AM IST
1/10

कोरोनाशी लढण्यासाठी अझीम प्रेमजींसह 'या' व्यक्तींकडून कोट्यवधींची आर्थिक मदत

कोरोना विषाणूशी लढण्यासाठी प्रत्येक देशातील सरकारपासून तेथील नागरिकांपर्यंत सर्वजण प्रयत्नशील आहे. शक्य त्या सर्व परिंनी साऱ्या जगालाच एका वळणावर आणून थांबवलेल्या या विषाणूवर मात करण्यासाठी मानसिक आधारासोबतच सर्वाधिक महत्त्वाच्या अशा आर्थिक आधारासाठीही आता अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. नेहमी जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत येणाऱ्या धनाढ्य व्यक्तींनी कोरोनाविरोधातील या लढ्यातही त्यांचं अतिशय मोलाचं असं योगदान दिलं आहे. ज्यामध्ये विप्रोच्या अझीम प्रेमजी यांच्यापासून ट्विरच्या सीईओ अर्थात कार्यकारी संचालक पदी असणाऱ्या जॅक डॉर्सी यांचा सामावेश आहे. 

2/10

कोरोनाशी लढण्यासाठी अझीम प्रेमजींसह 'या' व्यक्तींकडून कोट्यवधींची आर्थिक मदत

जॅक डॉर्सी- कोरोना विरोधात सुरु असणाऱ्या या संघर्षात मदत म्हणून ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांनी सर्वाधिक म्हणजेच शंभर कोटी युएस डॉलर्स इतकी मोठी मदत दिली आहे. 

3/10

कोरोनाशी लढण्यासाठी अझीम प्रेमजींसह 'या' व्यक्तींकडून कोट्यवधींची आर्थिक मदत

बिल आणि मेलिंडा गेट्स- मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा यांनी कोरोना बाधितांसाठीच्या या उपचारांमध्ये आणि या वैश्विक संकटाशी सामना करण्यासाठी २५.५ कोटी युएस डॉलर्स इतकी आर्थिक मदत केली आहे.   

4/10

कोरोनाशी लढण्यासाठी अझीम प्रेमजींसह 'या' व्यक्तींकडून कोट्यवधींची आर्थिक मदत

अझीम प्रेमजी - विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी १३.२ कोटी युएस डॉलर्स इतकी आर्थिक मदत करत, सर्वाधिक आर्थिक सहाय्य करणाऱ्यांच्या यादीत स्थान मिळवलं आहे.   

5/10

कोरोनाशी लढण्यासाठी अझीम प्रेमजींसह 'या' व्यक्तींकडून कोट्यवधींची आर्थिक मदत

जॉर्ज सोरोस- हंगेरी आणि अमेरिकन धनाध्य व्यक्तींच्या यादीत स्थान मिळवलेल्या जॉर्ज सोरोस यांनी कोरोनासाठीच्या या लढ्यात १३ कोटी युएस डॉलर्स इतकं योगदान दिलं आहे. 

6/10

कोरोनाशी लढण्यासाठी अझीम प्रेमजींसह 'या' व्यक्तींकडून कोट्यवधींची आर्थिक मदत

जेफ बेजोस- ऍमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस यांनी कोरोना विषाणूचा लढा पाहता या पार्श्वभूमीवर दहा कोटी युएस डॉलर्स इतकी आर्थिक मदत केली आहे. 

7/10

कोरोनाशी लढण्यासाठी अझीम प्रेमजींसह 'या' व्यक्तींकडून कोट्यवधींची आर्थिक मदत

जेफरी स्कोल- स्कोल फाऊंडेशनच्या संस्थापकपदी असणाऱ्या जेफरी स्कोल यांनीसुद्धा दहा कोटी ड़ॉलर्सची मदत करत कोरोनाविरोधातील लढ्यात आपलं योगदान दिलं आहे. 

8/10

कोरोनाशी लढण्यासाठी अझीम प्रेमजींसह 'या' व्यक्तींकडून कोट्यवधींची आर्थिक मदत

एँड्य्रू फॉरेस्ट- Fortescue Metals Groupचे माजी कार्यकारी अधिकारी आणि ऑस्ट्रेलियन उद्योगपती एँड्र्यू फॉरेस्ट यांनी सुद्धा १० कोटी युएस डॉलर्स इतकी आर्थिक मदत केली आहे. 

9/10

कोरोनाशी लढण्यासाठी अझीम प्रेमजींसह 'या' व्यक्तींकडून कोट्यवधींची आर्थिक मदत

मायकल डेल- डेल टेक्नोलॉ़जीचे अध्यक्ष, कार्यकारी अधिकारी आणि अमेरिकन उद्योगपती मायकल डेल यांनी कोरोनाशी सुरु असणाऱ्या या लढ्यामध्ये दहा कोटी डॉलर्सची मोठी मदत दिली आहे. 

10/10

कोरोनाशी लढण्यासाठी अझीम प्रेमजींसह 'या' व्यक्तींकडून कोट्यवधींची आर्थिक मदत

मायकल ब्लूमबर्ग - ब्लूमबर्गचे सह संस्थापक मायकल ब्लूमबर्ग यांनी कोरोनाशी सुरु असणारी ही झुंज पाहता या लढ्यात ७.४५ कोटी डॉलर्स इतकी मदत केली आहे. (सर्व छायाचित्रे- सोशल मीडिया)