उन्हाळी सुट्टीत फिरायला जायचंय? मुंबईजवळील 'या' 10 ठिकाणांना नक्की भेट द्या!

Best Summer Vacation Spot Near Mumbai: उन्हाळा (Summer) सुरु झाल्याने दिवसेंदिवस अंगाची लाहीलाही होत आहे. अशातच एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. मात्र, सुट्ट्यात घरी बसून काय करणार? फिरायला जायचं असेल तर कुठे जायचं? असा सवाल अनेकांना पडला असेल. मुंबई जवळील (Mumbai Picnic Spot) भटकंतीची ठिकाणं कोणती जाणून घ्या...

May 10, 2023, 17:02 PM IST

Best Picnic Spot Near Mumbai: उन्हाळा (Summer) सुरु झाल्याने दिवसेंदिवस अंगाची लाहीलाही होत आहे. अशातच एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. मात्र, सुट्ट्यात घरी बसून काय करणार? फिरायला जायचं असेल तर कुठे जायचं? असा सवाल अनेकांना पडला असेल. मुंबई जवळील (Mumbai Picnic Spot) भटकंतीची ठिकाणं कोणती जाणून घ्या...

1/10

पांडवकडा धबधबा

खारघर रेल्वे स्टेशनजवळ असलेला पांडवकडा धबधबा हा उन्हाळ्यात फिरण्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. वंडर्स पार्क, मँगो गार्डन बेलापूर, छान सनराइज पॉइंट, रॉक गार्डन ही ठिकाणं आवश्य पहावी.

2/10

महाकाली लेणी

अंधेरी रेल्वे स्थानक आणि जोगेश्वरी रेल्वे स्थानकावरून तुम्ही या ठिकाणावर पोहचू शकता. महाकाली लेणी ही इसवी सन पहिल्या शतकातील आणि मानवनिर्मित आहे. रेड कार्पेट वॅक्स म्युझियम आणि छोटा काश्मीर पार्क ही दोन आकर्षणे आहेत.

3/10

देवकुंड

देवकुंड हे उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात मुंबईजवळ भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. भिरा धरण आणि ताम्हिणी घाट हे दोन आकर्षणाची ठिकाणं आहेत.

4/10

कोलाड

शांततापूर्ण वातावरण, आरामदायी कॉटेज आणि उल्लट खेळ खेळायचे असेल तर कोलाड हा उत्तम पर्याय आहे. 120 किमी लांब असलेलं हे ठिकाण अविस्मरणीय राहिल.

5/10

दुर्शेत

कुंडलिका नदीवर रिव्हर राफ्टिंगचा अनुभव घेयचा असेल तर दुर्शेत हे एक उत्तम ठिकाण आहे. मुंबईपासून 80 किमी अंतरावर असलेलं दुर्शेतला तुम्ही वनडे ट्रीप काढू शकता.

6/10

सगुणा बाग

सगुणा बाग हे पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्य आणि भरपूर सुखद अनुभव देणारी जागा आहे. मालेगावमध्ये असलेल्या या सगुणाबागेत फिरस्त्यांची मोठी गर्दी देखील असते.

7/10

अलिबाग

मुंबईपासून 95 किलोमीटरच्या कमी अंतरावर असलेल्या अलिबागला उन्हाळ्यात फेरफटका सुखाची उपलब्धी आहे. दक्षिण मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावरून रस्त्याने किंवा फेरीद्वारे अलिबागला पोहोचता येतं.

8/10

कर्जत

मुंबईपासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर कर्जत हे ठिकाण आहे. उन्हाळ्यापासून सुटका मिळवायची असेल तर तुम्ही कर्जतमध्ये वेळ घालवू शकता. निसर्गरम्य वातावरण आणि बाइकिंग साहसी खेळ हे विशेष.

9/10

लोणावळा - खंडाळा

दोन दिवसाच्या पिकनिकसाठी कुठं जायचं? असा सवाल तुम्हाला देखील पडला असेल तर लोणावळा आणि खंडाळा ही ठिकाणं तुमच्यासाठी बेस्ट आहेत. मुंबईपासून 84 किलोमीटर अंतरावर असलेल्या लोणावळ्यात तुम्ही अनेक रिसॉर्ट्सचा पर्याय वापरू शकता. मित्रांसह किंवा मैत्रिणींसह हा वेगळा अनुभव पहायला मिळू शकतो.

10/10

बेसिन बीच

उन्हाळ्यात तुम्हाला शांत ठिकाणी जायचं असेल तर बेसिन बीच हा एक उत्तम पर्याय आहे. समुद्रकिनारे, मऊ वाळू, आणि शांत वातावरण अशी या बीचची ओळख. मुंबईपासून 65 किमी अंतरावर असलेल्या या समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठी 1 तास 30 मिनिटे अंदाजे वेळ लागतो.   (Photo Courtesy - MTDC Maharastra)