2023 मधील 'टॉप 10' प्रभावशाली महिला

Dec 31, 2023, 18:22 PM IST

भारतातील टॉप 10 महिला ज्यांनी 2023 मध्ये संपुर्ण वर्षभर  अनमोल असं कार्य करणाऱ्या महिलांची यादी सांगितली आहे. 

1/9

1) शीतल देवी

आशियाई पॅरागेम 2023 मध्ये पदक जिंकून भारताचं नाव मोठं करणारी शीतल देवी. विशेष म्हणजे 16 वर्षांची शीतल जगातील एकमेव हात नसलेली महिला तिरंदाज आहे. 

2/9

2) सावित्री जिंदल

कोणतंही पुस्तकी ज्ञान नसतानाही भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत सावित्री जिंदल हे नाव घेतलं जातं. फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादी 2023 नुसार जिंदाल समूहाच्या अध्यक्षा सावित्री जिंदाल या भारतातील सर्वात श्रीमंत महिला असून भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचा सहावा क्रमांक लागतो. 

3/9

3) इशिता किशोर

लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत दोनवेळा नापास होऊनही हार न मानता इशिता किशोरने युपीएससी परिक्षेत देशात पहिल्या क्रमांक पटकावला.   

4/9

4) डॉ. ऋतु करिधाल श्रीवास्तव

चांद्रयान-3 च्या लँडिगची जबाबदारी महिला शास्त्रज्ञ ऋतु करिधाल यांच्यावर सोपवण्यात आली होती. ऋतु करिधाल चांद्रयान 3 च्या मिशन डायरेक्टर म्हणून भूमिका निभावत होत्या.   

5/9

5) कॅप्टन शिवा चौहान

सियाचिन ही भारतातील सर्वात डेंजर युद्धभूमी समजली जाते.  सियाचीनसारख्या उंच युद्धभूमीवर पहिल्यांदाच एका महिला लष्करी अधिका-याची पोस्टिंग झाली आहे.  कॅप्टन शिवा चौहान(Captain Shiva Chauhan) यांची सियाचिनमध्ये पोस्टिंग झाली आहे.

6/9

6)निर्मला सीतारमण

फोर्ब्सच्या जगातील सर्वांत शक्तिशाली महिलांच्या यादीत निर्मला सीतारामन यांना ३२ वे स्थान देण्यात आले आहे. . या यादीत निर्मला सीतारामन यांनी सलग पाचव्यांदा स्थान मिळवले आहे. 

7/9

7)किरण मजूमदार-शॉ:

फोर्ब्सच्या जगातील सर्वांत शक्तिशाली महिलांच्या यादीत मजुमदार-शॉ यांचा ७६ वा नंबर आहे. मजुमदार-शॉ यांनी १९७८ मध्ये बायो फार्मास्युटिकल फर्म बायोकॉनची स्थापना केली, त्यांचा मलेशियाच्या जोहोर भागात आशियातील सर्वांत मोठा इन्सुलिनचा कारखाना आहे.    

8/9

8) रोशनी नादर मल्होत्रा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह सर्वांत शक्तिशाली महिलांच्या यादीत रोशनी नादर यांचाही समावेश आहे. रोशनी नादर एचसीएलचे संस्थापक आणि उद्योगपती शिव नाडर यांच्या मुलगी आहेत. रोशनी एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या सीईओपदी कार्यरत आहेत. 

9/9

9) नीता अंबानी

नीता अंबानी  या रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा आहेत. या वर्षी ऑक्टोबरमध्ये, यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमने नीता अंबानी यांना ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड दिला होता.