Bollywood Horror Movies: काल्पनिक नव्हे तर सत्य घटनांवर आधारित आहेत 'हे' Horror चित्रपट; एकटे पाहूच शकणार नाही

Bollywood Horror Movies: बॉलिवूडमध्ये आजवर अनेक हॉरर चित्रपट (भयपट) बनवण्यात आले आहेत. आज आपण अशाच काही भयपटांविषयी जाणून घेणार आहोत जे सत्य घटनेवर आधरीत आहेत. 

| Jul 31, 2024, 18:43 PM IST
1/7

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आतापर्यंत अनेक हॉरर चित्रपट पाहिलेत. त्यापैकी अनेकांना प्रेक्षकांकडून पसंती मिळाली. आज आम्ही तुम्हाला सत्य घटनेवर आधारीत असलेल्या हॉरर चित्रपटांविषयी जाणून घेणार आहोत. 

2/7

स्त्री

या लिस्टमध्ये 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या स्त्री या चित्रपटाचं नाव येतं. हा चित्रपट कर्नाटकच्या नाले बावर आधारित आहे. असं म्हटलं जातं की ही गोष्ट एका गावातील आहे. ज्या गावात रोज रात्री डायन म्हणजेच चेटकीन आवाज काढून दरवाजा ठोकते आणि त्यानंतर घरातील पुरुषांचा जीव घेते. 

3/7

2011 मध्ये प्रदर्शित झालेला जान्हवी कपूर आणि राजकुमार रावचा रूही हा चित्रपट देखील या यादीत येतो. 

4/7

असं म्हटलं जातं की ही एका महिलेची गोष्ट आहे जिचं लग्न तिच्या इच्छे विरुद्ध करण्यात आलं होतं. त्यामुळे तिनं नदीत उडी मारून जीव दिला. 

5/7

Ragini MMS देखील या यादीत आहे. या चित्रपटाची पटकथा ही दिल्लीच्या राहणाऱ्या 22 वर्षांची मुलगी दीपिकावर आधारीत आहे. 

6/7

तर Ragini MMS या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या कैनाज मोतीवालनं एका मुलाखतीत हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत असल्याचं सांगितलं होतं. 

7/7

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)