मराठीतील 'या' बोल्ड web series हेडफोन लावूनच पाहा; नाहीतर उठेल बाजार!

Top Marathi Hot Web Series  : मराठीत अशा अनेक वेब सीरिज आहेत ज्या रोमान्स, थ्रील, ड्रामा आणि सस्पेन्सनं भरलेल्या आहेत. त्यातही अशा अनेक वेब सीरिज आहेत, ज्याविषयी अनेकांना काहीच माहित नाही आहे. अशा अनेक सीरिज आहेत ज्या तुम्ही घर बसल्या ओटीटीवर पाहू शकता. त्यातही या वेब सीरिज या हिंदी वेब सीरिज प्रमाणेच तुमचं मनोरंजन करतील. चला तर जाणून घेऊया अशा वेब सीरिज विषयी ज्या तुम्ही घरबसल्या पाहू शकता. 

Feb 16, 2024, 19:08 PM IST
1/7

डेट विथ सई

Top Marathi Hot Web Series

ZEE5 ओरिजिनल मराठी हॉट वेब सीरिज आहे. या सीरिजमध्ये सई ताम्हणकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. या सीरिजमध्ये दोन लोकप्रिय अभिनेत्रींच्या मागे त्यांचा चाहता लागतो आणि त्या त्यांच्या आयुष्यात काय करता हे जाणून घ्यायचं असतं. 

2/7

सालसुड - द फेक इनोसन्स

Top Marathi Hot Web Series

ही सीरिज चिटिंगवर आधारीत आहे, की कशाप्रकारे लोकांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स असतात. ही सीरिज तुम्ही युट्यूबवर पाहू शकतात. 

3/7

FOMO

Top Marathi Hot Web Series

ही सीरिज युट्यूबवर तुम्ही पाहू शकतात. या सीरिजमध्ये एका छोट्याश्या गावातून आलेल्या एका तरुणाची कथा दाखवण्यात आली आहे. कशा प्रकारे तो नोकरीच्या शोधात असतो आणि त्यानंतर कशा प्रकारे काही लोकांना भेटून त्यांच्यासोबत फिजिकल रिलेशनशिपमध्ये येतो.

4/7

हनीमून सावधान

Top Marathi Hot Web Series

हनीमून सावधान ही मराठी वेब सीरिद तुम्ही युट्यूबवर पाहू शकता. या सीरिजची पटकथा ही रोहित आणि विद्याच्या आयुष्यावर आधारीत आहे. त्या दोघांची भेट ही अरेंज मॅरेजमुळे होते आणि त्यानंतरची त्यांची त्यांची केमिस्ट्री तुम्हाला यात पाहायला मिळेल. 

5/7

समांतर

Top Marathi Hot Web Series

समांतर ही वेब सीरिज कुमार महाजन नावाच्या एका माणसाच्या आयुष्यावर आहे. ही सीरिज सस्पेन्सनं भरलेली आहे. ही सीरिज तुम्ही एमएक्स प्लेअरवर पाहू शकता. 

6/7

हॉर्न ओके प्लीज

Top Marathi Hot Web Series

अद्वैक आणि गायत्री या दोघांची विरुद् पर्सनॅलिटी आहे. अशा परिस्थितीत जेव्हा त्या दोघांना जबरदस्ती एकत्र रहावं लागतं तेव्हा काय होतं हे पाहायला अनेकांना मज्जा येते. ही सीरिज तुम्ही ZEE5 वर पाहू शकता.  

7/7

एक थी बेगम

Top Marathi Hot Web Series

या सीरिजमध्ये अनुजा साठेनं महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ही सीरिज तुम्ही एमएक्स प्लेअरवर पाहू शकता. (All Photo Credit : Social Media)