PHOTO: मनाला हवीये शांती तर मुंबईतील 'या' 8 पुरातन मंदिरांना नक्की भेट द्या..

Top 8 Famous  Oldest Temples in Mumbai : मुंबईतील फिरण्यासारखी अशी कोणती मंदिरं आहेत? जिथं जाऊन तुमच्या मनाला शांती मिळेल. चला तर मग जाणून घेऊया.

| Jun 18, 2024, 16:24 PM IST
1/8

मुंबादेवी मंदिर

मुंबादेवी मंदिर हे शहरातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे. मुंबई शहराचे नाव मुंबादेवी मंदिरावरून पडलं आहे. हे मंदिर सुमारे 400 वर्षे जुने आहे.

2/8

बाबुलनाथ मंदिर

बाबुलनाथ मंदिर हे मुंबईतील एक प्राचीन शिवमंदिर आहे. गिरगाव चौपाटीजवळ एका छोट्या टेकडीवर वसलेले हे मंदिर शहरातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे.

3/8

महालक्ष्मी मंदिर

मुंबईतील सर्वात प्रसिद्ध मंदिर म्हणजे महालक्ष्मी मंदिर.. 1831 मध्ये हिंदू व्यापाऱ्याने बांधलेलं हे मंदिर आहे. सुंदर नक्षीकामाचा नमुना म्हणून या महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे पाहिलं जातं.

4/8

वाळकेश्वर मंदिर

दक्षिण मुंबईतील मलबार हिलच्या वाळकेश्वर भागात असलेलं ऐतिहासिक वाळकेश्वर मंदिर पाहण्यासाठी लांबून लोक येतात. वाळकेश्वर हे नाव वाळुका ईश्वर या शब्दावरून आले आहे, ज्याचा अनुवाद "वाळूचा देव" असा होतो.

5/8

स्वामीनारायण मंदिर

मुंबईतील स्वामीनारायण मंदिर हे 1863 मध्ये बांधलं गेलं होतं. तर सध्याचे मंदिर हे 1903 मध्ये पुर्नबांधणी केली गेली होती. सुट्टीच्या दिवशी अनेकजण या मंदिराला भेट देतात.

6/8

सिद्धिविनायक मंदिर

सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराची स्थापना 1801 मध्ये देवभाई पाटील आणि लक्ष्मण विठू यांनी केली होती.

7/8

मिनी सबरीमाला

कांजूरमार्गमधील अयप्पा देवाला समर्पित मिनी सबरीमाला मंदिर हे मुंबईतील प्रसिद्ध मंदिरापैकी आहे. एका छोट्या टेकडीवर हे मंदिर आहे.

8/8

बालाजी मंदिर

नेरुळ येथील बालाजी मंदिर एका छोट्या टेकडीवर बांधलेलं आहे. हे मंदिर नेरूळ रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ आहेत.