दक्षिण आफ्रिकेला 55 धावांवर गुंडाळणाऱ्या भारताने यापूर्वीही केले असे पराक्रम! यादीच पाहा…

IND vs SA 2nd Test: 3 जानेवारी रोजी सुरु झालेल्या या सामन्यात टीम इंडियाच्या नावे नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. या सामन्यात मोहम्मद सिराजने 6 विकेट्स घेतल्या आहेत. मुख्य म्हणजे, भारतासमोर टेस्ट क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेची टीम 55 रन्समध्ये ऑलआऊट झाली

Jan 04, 2024, 18:18 PM IST
1/10

भारताविरुद्धच्या कसोटीत सर्वात कमी रन्सवर ऑल आऊट झालेले संघ तुम्हाला माहित आहे का?  

2/10

3 जानेवारी रोजी सुरु झालेल्या या सामन्यात टीम इंडियाच्या नावे नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. या सामन्यात मोहम्मद सिराजने 6 विकेट्स घेतल्या आहेत. मुख्य म्हणजे, भारतासमोर टेस्ट क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेची टीम 55 रन्समध्ये ऑलआऊट झाली. दक्षिण आफ्रिकेव्यतिरिक्त अजून कोणते देश असे आहेत, ज्यांना टीम इंडियाने फारच कमी स्कोरमध्ये गुंडाळलं आहे, पाहुयात  

3/10

3 डिसेंबर 2021 रोजी न्यूझीलंडची संपूर्ण टीम भारताविरुद्ध 62 रन्सवर ऑलआऊट झाली. या सामन्यात रविचंद्रन अश्विनने 4 विकेट्स घेतले होते.  

4/10

25 नोव्हेंबर 2015 रोजी दक्षिण आफ्रिकेची पूर्ण टीम भारताविरूद्ध 79 रन्सवर करुन संपूर्ण टीम बाद झाली होती. अश्विनने या सामन्यात 5 खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं होतं.

5/10

24 फेब्रुवारी 2021 रोजी इंग्लंडची टीम इंडियाविरुद्ध केवळ 81 रन्समध्ये पॅव्हेलियनमध्ये परतली होता. अक्षर पटेलने या सामन्यात 5 विकेट्स घेतले होते.  

6/10

23 नोव्हेंबर 1990 रोजी श्रीलंकेच्या क्रिकेट टीमने 82 रन्स केले आणि संपूर्ण टीम बाद झाली होती. वेंकटपथी राजूने या डावात 6 विकेट्स घेतले होते.  

7/10

7 फेब्रुवारी 1981 रोजी ऑस्ट्रेलियाची टीम भारताविरुद्ध 83 रन्सवर गारद झाली होती. या सामन्यात कपिल देवने 5 विकेट्स घेतले होते.  

8/10

दक्षिण आफ्रिकेच्या टीमला 15 डिसेंबर 2006 रोजी  भारताविरुद्ध केवळ 84 रन्सपर्यंत मजल मारता आली होती. या सामन्यात श्रीशांतने 5 विकेट्स घेतल्या होत्या.  

9/10

यामध्ये बांगलादेशाच्या टीमचाही समावेश आहे. 10 नोव्हेंबर 2000 बांगलादेशची टीम भारताविरुद्ध केवळ 91 धावांवर ऑलआऊट झाली होती. या सामन्यात जवागल श्रीनाथने 19 रन्स आणि सुनील जोशीने 27 धावांत 3 विकेट घेतले होते.  

10/10

ऑस्ट्रेलियाने 9 फेब्रुवारी 2023 रोजी भारतीय संघाविरुद्ध 91 रन्स करुन सर्व खेळाडूंना बाद केलं होतं. या सामन्यात रविचंद्रन अश्विनने 5 विकेट्स घेतले.