Photo: Toyota Innova Hycross गाडीचं भारतात सादरीकरण, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Toyota Innova Hycross: टोयोटाने भारतात ऑल-न्यू इनोव्हा हायक्रॉस सादर केली आहे. कारप्रेमींमध्ये या गाडीबाबत प्रचंड उत्सुकता आहे. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बाबत माहिती शेअर केली आहे. ही गाडी जानेवारी 2023 मध्ये लाँच केली जाईल. त्यानंतरच किंमती जाहीर केल्या जातील. पाहा फोटो

Nov 25, 2022, 14:00 PM IST
1/5

Toyota Innova Hycross

टोयोटा इनोव्हा हायक्रॉसला दोन पॉवरट्रेन मिळतील, जे 2.0L पेट्रोल इंजिन (मजबूत हायब्रिड) आणि 2.0L पेट्रोल इंजिन (मजबूत हायब्रिडशिवाय) आहेत. स्ट्राँग हायब्रिड सेटअप 186bhp कम्बाइंड पॉवर जनरेट करेल. त्याला ई-सीव्हीटी मिळेल. या गाडीचा मायलेज 21.1 किमीपर्यंत आहे.

2/5

Toyota Innova Hycross

हायब्रिड मॉडेलचे इंजिन 174bhp पॉवर आणि 197Nm टॉर्क आउटपुट करेल. हे CVT सह येईल. या एमपीव्हीमध्ये फक्त डिझेल इंजिन आणि मॅन्युअल गिअरबॉक्सचा पर्याय मिळेल.

3/5

Toyota Innova Hycross

नवीन टोयोटा एमपीव्ही नवीन डिझाइन केलेल्या ट्विन-लेयर डॅशबोर्डसह येईल. यात 7-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 10-इंच टचस्क्रीन सिस्टम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, कनेक्टेड कार तंत्रज्ञान आणि ड्युअल 10-इंच रियर टचस्क्रीन सिस्टम मिळेल.

4/5

Toyota Innova Hycross

टोयोटा इनोव्हा हायक्रॉसमध्ये पॅनोरामिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स, 360 डिग्री कॅमेरा, ADAS, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, 6 एअरबॅग्ज, हिल होल्ड/डिसेंट कंट्रोल, ईएसपी आणि ऑटो ब्रेक होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक यांसारखी वैशिष्ट्ये देखील मिळतील.

5/5

Toyota Innova Hycross

या गाडीची  किंमत अंदाजे 22 लाख ते 28 लाख रुपये (एक्स-शोरूम) या दरम्यान असू शकते.