2040 पर्यंत चंद्र आणि मंगळावर मानवी वस्ती निर्माण होणार; टोयोटोच्या खास वाहनातून प्रवास
आर्टेमिस हे मिशन यशस्वी झाले तर, 2025 पर्यंत अंतराळवीर चंद्रावर पाठवले जाणार आहे. Toyota Lunar Cruiser च्या निर्मितीमुळे हे स्वप्न प्रत्यक्षात साकरण्यास मदत होणार आहे.
Toyota Lunar Cruiser: अमेरिकेच्या 50 वर्षांपूर्वीच्या अपोलो मिशननंतर पुन्हा एकदा प्रथमच अंतराळवीरांना चंद्रावर नेण्याची तयारी सुरु आहे. आंतराळ संशोधन संस्था 'नासा'नं मून मिशन 'आर्टेमिस'ची तयारी करत आहे. या चंद्र मोहिमेसाठी टोयाटो कंपनी 'लुनार-क्रूझर' रोव्हर तयर करत आहे. टोयोटा आणि जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (JAXA) यांनी हायड्रोजनवर चालणाऱ्या मून रोव्हरच्या निर्मीतीची घोषणा केली होती. या रोवरमुळे मानवाचे चंद्रावर जाण्याचे स्वप्न पुन्हा एकदा प्रत्यक्षात साकारणार आहे. Toyota Lunar Cruiser मुळे 2040 पर्यंत चंद्र आणि मंगळावर मानवी वस्ती निर्माण करण्याचे उद्दीष्ट पूर्ण होण्यास देखील मदत होणार आहे.